मुक्तपीठ टीम
नुकतीच कोल्हापूर पोटनिवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने लागला. आघाडीतर्फे लढणाऱ्या काँग्रेसला कोल्हापूरकरांचा कौल मिळाला असला तरी पक्षाच्या हिताचा विचार करत त्यावेळी आलेले काही अनुभव काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी मांडले आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडियाचे सरचिटणीस ऋषिकेश पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीबद्दल काँग्रेसच्या नेत्यांचे आलेले काही गंभीर अनुभव सांगितले आहेत. त्यांनी ट्वीट करत आपल्या पक्षातील नेत्यांची तक्रार केली आहे. त्यांनी ट्वीट करताच अनेकांनी त्यांच्या मतावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
काय म्हणाले ऋषिकेश पाटील?
- कोल्हापूर पोटनिवडणूक प्रचारावेळी ग्राउंड लेव्हलला काम करताना खूप चांगले वाईट अनुभव आले.
- अगदी सामान्य मतदारांना काँग्रेसबद्दल, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल काय वाटते हे अनुभवायला मिळाले.
कोल्हापूर पोटनिवडणूक प्रचारावेळी ग्राउंड लेव्हलला काम करताना खूप चांगले वाईट अनुभव आले. अगदी सामान्य मतदारांना काँग्रेसबद्दल, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल काय वाटते हे अनुभवायला मिळाले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत माझी एक नेहमीच तक्रार राहिलेली आहे.
1/5 pic.twitter.com/NCzSOnpiXf— Hrishikesh S Patil – INC (@hrishipatil1) April 20, 2022
घरोघरी प्रचारात काँग्रेस कमी पडते!
- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत माझी एक नेहमीच तक्रार राहिलेली आहे.
- आपले काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करण्यात कमी पडतात.
- अगदी ग्रामपंचायतीत निवडून आलेला सदस्य सुध्दा “आता काय मी पत्रकं वाटायची काय” म्हणताना दिसतो.
- कदाचित बराच काळ सत्ता असल्यामुळे म्हणा किंवा नेत्यांच्या बरोबर फिरून एक प्रकारची आलेली मोठेपणाची भावना म्हणा पण पण कार्यकर्त्यांच्यात ग्राउंड लेव्हल प्रचारासाठी, अगदी तळागाळात पक्षाचे कार्यक्रम राबवण्यासाठी एक प्रकारची अनास्था आली आहे.
भाजपाला टोकाचा विरोधच, पण काही गोष्टी शिकण्यासारख्या!
- भाजप विरोधक असले तरी काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
- अगदी अमित शहा सुध्धा मागच्या एका निवडणुकीत पत्रक वाटताना दिसले होते.
- बाकी संघ-भाजपेयींच्या बाकीच्या गुणांबद्दल त्यांना टोकाचा विरोध राहीलच.
आधी ग्राऊंड लेव्हलला काम करू…
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच काँग्रेसने काय केले पाहिजे यावर कधीकधी सोशल मीडियावर चर्चेचा महापूर येतो.
- पण राहुल – सोनियाजीनी आणि काँग्रेसने काय केले पाहिजे यावर चर्चा करण्याआधी येणाऱ्या कुठ्ल्याही निवडणुकीत अपमान न वाटता अगदी ग्राउंड लेव्हल ची जवाबदारी घेऊया.
- मोठी पदे ,मोठ्या नेत्यांबरोबर जरूर काम करू पण अगदी सामान्य मतदारांपर्यंत पोचण्यासाठी निवडणुकीच्या कामाची जबाबदारीही घेऊ. काँग्रेसला ताकद देऊ…
ऋषिकेश पाटील यांच्या अनुभव प्रदर्शनावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे आहेत:
काम सोशल मीडियाचं, पण ग्रुप सक्रिय नाही!
- हृतिक घारगे या तरुणाने मांडले सोशल मीडिया टीमचे अनुभव मांडले आहेत.
- माझा अनुभव सांगतो मी जेव्हा गांधी नेहरू पटेल बोस यांना वाचून काँग्रेसच्या विचाराकडे आकर्षित झालो.
- तेंव्हा मी आमच्या तालुक्यात काँग्रेस कुठ आहे ते बघण्यासाठी फेसबुक वर सर्च करून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधला व सोशल मीडियाचा अध्यक्षांना फोन केला.
- मी त्यांना म्हटल मला काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुप ला मला add करा तर पदाधिकारी बोलला काँग्रेसचा व्हाट्सअप ग्रुप नाही.
- मी म्हणलो तुम्ही सोशल मीडिया अध्यक्ष आहे व ग्रुप कसा काही नाहीये तर म्हणाला नावाला आहे.
- दुसरे पदाधिकारी काम करत नाही त्यामुळे मला पण इंटरेस्ट येत नाही.
नेत्यांचे वर्तन खुपणारं!
- झोहेब सलिम शेख यांना जे खुपले ते त्यांनी मांडले आहे.
- जर समजा एखाद्याने सांगितलं बाबा माझं अमुक काम आहे…माझी मदत कर.
- आपण मदत करायला गेलो तेव्हा आपला मंत्री नेता फोनच उचलत नाही किंवा ऑफिसच्या बाहेरुन हाकलून दिले जाते तर मतदार काय म्हणेल.
- “अगोदर स्वतःचं निस्तरुन घे, मग मते मागायला ये”
नेते एसीबाहेर नाहीत!
- मराठवाड्यातील अंकुशराव पाटील म्हणाले की, नेते एसीच्या बाहेर निघत नाहीत. मोठ्या पदावर असलेले नेते संघर्ष,आंदोलनापासून दूरच राहणार.
राहुल गांधींनीच काही करावं!
- अजय जाधव यांनी राहुल गांधींकडे मागणी केली की, काही तरी करा, तरुणांना काँग्रेसमध्ये सामील व्हायचं आहे.
- रौनक छेडा यांनी या सर्व पाच मतांशी सहमती दर्शविली आहे.