Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: मराठी प्रेक्षकांचा कौल कुणाला? का सोपं नाही टीव्ही 9चं स्थान पटकावणं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
TV rating TV9

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्सचं टीव्ही रेटिंगचं चित्र सध्या तरी फारसं बदलताना दिसत नाही. मराठी न्यूज चॅनल्सच्या टीव्ही रेटिंग स्पर्धेत या आठवड्यातही पुन्हा एकदा टीव्ही 9 मराठीने आपला पहिला क्रमांक राखला आहे. तेवढंच नाही तर सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी झी २४ तासशी असलेलं अंतरही वाढवलं आहे. झी २४ तास या चॅनलचे रेटिंग या आठवड्यातही पुन्हा कमी झाले आहे. यावेळी ०.९ ने रेटिंग कमी झाले. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझा ०.४ने मागे गेले आहे.

टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…

  • मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे.
  • झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात आणखी मागे गेलं आहे. टीव्ही 9चं पहिलं स्थान आता आणखी काही आठवड्यांसाठी तरी सुरक्षित झालं आहे.
  • सध्या चार आठवड्यांच्या सरासरीवर टीव्ही रेटिंग काढले जात आहे.
  • त्यामुळे पहिला क्रमांक मिळवायचा असेल तर किमान दहाने २४ तासला तर माझाला त्याच्या दुपटीने कामगिरी बजावावी लागेल. तेवढा पल्ला गाठणं सध्यातरी सोपं नाही.
  • त्यातच एबीपी माझा ०.४ ने मागे गेले आहे.
  • सामने या आठवड्यात .४ ने कामगिरी सुधारली आहे.
  • न्यूज 18 लोकमत .३ ने वाढ नोंदलली असली तरी पाचवा क्रमांक आणि एक आकडी रेटिंग कायम आहे.
  • लोकशाहीची स्थिती सहाव्या क्रमांकावर जैसे थे आहे.

 

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.८ % मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.७ ची वाढ आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावर २६.३% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे. गेल्या गुरुवारपेक्षा त्यांच्यात ०.९ ची घट आहे.
  • एबीपी माझा १८.४ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.४ची घट आहे.
  • चौथ्या क्रमांकावर साम टीव्हीने .४ वाढ नोंदवली असून १२.४% मार्केट शेअरसह आहे.
  • पाचव्या क्रमांकावर ८.६ % मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.३ची वाढ आहे.
  • सहाव्या क्रमांकावर लोकशाही ५.५ % मार्केट शेअरसह आहे.

 

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे.
  • त्यामुळे अनेक टीव्ही चॅनल्सनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत.
  • फ्री डिशवरील वितरणामुळे झी समुहातील झी २४ ताससह ९ प्रादेशिक वाहिन्यांना ३० टक्के जास्त रेटिंग असलेल्या मार्केटमघ्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • प्रसारभारतीनेही बार्ककडे झीविरोधात तक्रार केली आहे.
  • पण अद्याप त्याप्रकरणी काहीही कारवाई झालेली नाही.

सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.

  • या गुरुवारी वर्षातील ११ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ८, ९, १० आणि ११ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

सरळस्पष्ट

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

 

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

गेल्या आठवड्यात कसं होतं मराठी न्यूज चॅनल्सचं

  • मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: सतत नवव्या आठवड्यात टीव्ही 9 अव्वल! २४ तास, एबीपी माझाचं काय

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: सतत नवव्या आठवड्यात टीव्ही 9 अव्वल! २४ तास, एबीपी माझाचं काय?

  • टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.

    नक्की पाहा:


Tags: ABP MAZAMarathi Channelsmuktpeethmumbaitulsidas bhoiteTV RatingTV9तुळशीदास भोईटेमराठी न्यूज चॅनल्समुक्तपीठ
Previous Post

काँग्रेसचं काय चुकतं? वाचा कोल्हापूर जिंकताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आलेले कटू अनुभव…

Next Post

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

Next Post
maharashtra Cabinet Decision 21-04-22

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!