मुक्तपीठ टीम
आई राधा उदो..उदो…आई राधा उदो…उदो…एकच जयघोष होतो. चुनखडीचे खडे पालखीवर टाकताना भाविकांचा उत्साह वाढतो. येरमाळ्यातील चुन्याचं रान दुमदुमून जातं. वेगळी परंपरा, वेगळे रितीरवाज जपत आपली संस्कृती जपणाऱ्या या गावोगावच्या यात्रा
कोरोणाच्या संकटामुळे दोन वर्षे तशी खूपच सुनीसुनी गेली. आता गावोगावच्या यात्रां ना पुन्हा सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळाची यात्रा लाखो भाविकांची गर्दी उसळणारी. लाखोंचं आराध्य दैवत असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सुरुवात झाली आहे. रविवारपासून यात्रा सुरु झाली. प्रत्येक यात्रेची एक परंपरा असते. येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेचीही अशीच परंपरा आहे. चैत्र पौर्णिमेला आई तुळजा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक येरमाळ्याला येडेश्वरी देवीच्या दर्शनाला जातात. तेथे चुन्याच्या मळ्यावर चुना वेचतात. चुनखडीचे खडे वेचुन येडेश्वरी देवीच्या पालखीवर उधळला जातो. भाविक आई राधा उदो उदोचा जय घोष करतात. या जयघोषानं चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून जात असतो. या रविवारीही तसंच घडलं.
चुन्याच्या मळ्यात चुना वेचून पालखीवर उधळण्याची परंपरा!
- श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या परंपरेला महत्व आहे.
- यात्रेत पहिल्या दिवशी येणारी पालखी चुन्याच्या रानात येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर उधळतात.
- आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते.
- यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावुन भाजला जातो.
- पालखी मुख्य मंदिरात जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते.
- ही परंपरा गेल्या कित्येक पिढ्यांपासून पाळली जाते.
पाहा व्हिडीओ: