Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा, चुनखडीचे खडे पालखीवर टाकण्याची परंपरा!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Chaitra Pournima Yatra of Goddess Yedeshwari

मुक्तपीठ टीम

आई राधा उदो..उदो…आई राधा उदो…उदो…एकच जयघोष होतो. चुनखडीचे खडे पालखीवर टाकताना भाविकांचा उत्साह वाढतो. येरमाळ्यातील चुन्याचं रान दुमदुमून जातं. वेगळी परंपरा, वेगळे रितीरवाज जपत आपली संस्कृती जपणाऱ्या या गावोगावच्या यात्रा

Chaitra Pournima Yatra of Goddess Yedeshwari

कोरोणाच्या संकटामुळे दोन वर्षे तशी खूपच सुनीसुनी गेली. आता गावोगावच्या यात्रां ना पुन्हा सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळाची यात्रा लाखो भाविकांची गर्दी उसळणारी. लाखोंचं आराध्य दैवत असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सुरुवात झाली आहे. रविवारपासून यात्रा सुरु झाली. प्रत्येक यात्रेची एक परंपरा असते. येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेचीही अशीच परंपरा आहे. चैत्र पौर्णिमेला आई तुळजा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक येरमाळ्याला येडेश्वरी देवीच्या दर्शनाला जातात. तेथे चुन्याच्या मळ्यावर चुना वेचतात. चुनखडीचे खडे वेचुन येडेश्वरी देवीच्या पालखीवर उधळला जातो. भाविक आई राधा उदो उदोचा जय घोष करतात. या जयघोषानं चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून जात असतो. या रविवारीही तसंच घडलं.

Chaitra Pournima Yatra of Goddess Yedeshwari

चुन्याच्या मळ्यात चुना वेचून पालखीवर उधळण्याची परंपरा!

  • श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या परंपरेला महत्व आहे.
  • यात्रेत पहिल्या दिवशी येणारी पालखी चुन्याच्या रानात येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर उधळतात.
  • आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते.
  • यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावुन भाजला जातो.
  • पालखी मुख्य मंदिरात जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते.
  • ही परंपरा गेल्या कित्येक पिढ्यांपासून पाळली जाते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Good news MorningKalambPournima YatraUsmanabadYedeshwari Deviyermalaउस्मानाबादकळंबपोर्णिमा यात्रायेडेश्वरी देवीयेरमाळा
Previous Post

शिक्षक स्मशानातून रुग्णालयात! उपोषणाचा १७ वा दिवस! न्याय कधी? – व्हिडीओ पाहा

Next Post

मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन आणि संवर्धनाचा कालबद्ध कार्यक्रम

Next Post
Uddhav Thackeray's instructions for preservation and conservation of temples, forts and monuments

मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन आणि संवर्धनाचा कालबद्ध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!