मुक्तपीठ टीम
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना मिळाला आहे. हा कौलही खूप चांगल्या फरकाने आहे. कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या जयश्री जाधवांना ९६ हजार २२६ मते तर भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मते दिल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ हजार ६४४ मतांनी जयश्री जाधव विजय मिळविला आहे. निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, मतांच्या टक्केवारीच्या हिशेबात आघाडीला ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मते तर भाजपाला ४३ टक्के मते मिळाली आहेत.
पोटनिवडणुकांच्या सामन्यांमध्ये आता २-१
- महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या यापूर्वीच्या दोन पोटनिवडणुकांमध्ये एक आघाडीला तर एक भाजपाला मिळाली होती.
- त्यामुळे लोकप्रियता नेमकी कुणाची त्यावर परस्परांच्या विरोधातील दावे प्रतिदावे होत होते.
- आताची तिसरी पोटनिवडणूक आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जिंकत असल्याने २-१ असा निकाल दिसत आहे.
- तीन पोटनिवडणुकांपैकी दोन आघाडीने तर एक भाजपाने जिंकली आहे.
निकाल
- काँग्रेस – जयश्री जाधव
- भाजपा – सत्यजित कदम
आघाडी नाराजी दूर सारत लढली आणि जिंकली!
- काँग्रेसचा उमेदवार असला तरी पूर्णच महाविकास आघाडी ताकदीनिशी कोल्हापूरची लढाई लढत होती.
- सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीशी समन्वय साधत प्रचाराची आघाडी सांभाळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही वेळ दिला.
- तसेच खासदार अमोल कोल्हे यांची तोफही कोल्हापुरात धडाडली. हा मतदारसंघ शिवसेनेकडे पाच निवडणुका असल्याने तो शिवसेनेलाच मिळावा अशी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी होती.
- मात्र, उद्धव ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर ते शांत झाले आणि शिवसैनिक कामाला लागले.
- तरीही भाजपा नेते शिवसैनिक आणि शिवसेनेचे मतदार भाजपासोबत असल्याचे शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- शिवसैनिक आणि सेनेच्या मतदारांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न झाला.
- त्यामुळे अखेरच्या दिवशी शेवटचं भाषण हे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं असावं, असं नियोजन करण्यात आलं.
- त्यामुळे आघाडी मतदानासाठी एकमुखानं उतरली आणि चांगल्या फरकानं जिंकली!
कोल्हापुरात पंढरपूर नाही, उद्गिर झालं!
- कोल्हापूर हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा.
- ते गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर सोडून पुण्यात गेले, तेथे निवडून आले.
- पोटनिवडणुकीच्या प्रचारात आघाडीप्रमाणेच भाजपानेही जोर लावला.
- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्याहून कोल्हापुरातच तळ ठोकून होते.
- त्यांनी प्रदेश भाजपाचीही सर्व यंत्रणा कोल्हापुरातच उतरवली होती.
- भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंसह अनेक नेते कोल्हापुरात माध्यम आणि प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते.
कोल्हापूर का महत्वाचं?
- महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून दोन पोटनिवडणुका झाल्या. कोल्हापूरची तिसरी पोटनिवडणूक आहे.
- पंढरपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील जागा भाजपाने हिसकावून घेतली. तेथे भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले.
- तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणे भाजपाला उपयोगी ठरली.
- नांदेडमधील देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार अंतापुरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले.
- तेथे भाजपाने शिवसेनेच्या माजी आमदाराला लढतीत उतरवून शिवसेनेची मते कमळाकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता.
- पण तो अयशस्वी ठरला.
- आता ही तिसरी पोटनिवडणूक आहे. आतापर्यंत एक एक असे विजय मिळालेत. आता तिसरा विजय दोन्ही बाजूंसाठी महत्वाचा होता.
- आघाडीने कोल्हापूर जिंकल्याने आता तीन सामन्यांमध्ये २-१ अशी स्थिती आहे.
कोल्हापूरकरांनी आघाडीला जिंकवून दाखवलंय!
- कोल्हापुरात पाचवेळा शिवसेना निवडून आली आहे.
- २०१४मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनीच काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता.
- ते कदम हेच या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार होते.
- सुरुवातीच्या काळातील स्थानिक शिवसेनेतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनीही केला.
कोल्हापूरकरांचा कौल आघाडीला का?
- कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली ती कोरोना लाटा ओसरून राज्यात निर्बंध राज्य संपले असताना.
- राज्यात कोरोना लाटेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले, घराघरात पोहचले. त्यांची लोकप्रियता, शरद पवारांचा प्रभाव आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची पकड, सहानुभुती याचा आघाडीला मिळालेल्या कौलात मोठा वाटा आहे.
- भाजपाने ही लढत प्रतिष्ठेची करत संपूर्ण बळ झोकून दिलं होतं.
- भाजपाने आघाडीवर केलेले सततचे घोटाळ्यांचे आरोप, तसेच कोल्हापूरसाठी जाहीर केलेला वचननामा आणि शिवसेनेतील कथित नाराजी यावर भाजपाची भिस्त होय.