Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रावर वीज संकट : केंद्र – राज्य वादात सामान्य आणि उद्योग-व्यवसायांची होरपळ!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
coal shortage

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात उष्णतेची मोठी लाट आली आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना राज्यात मोठं वीज संकट कोसळलं आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी दावा केला की, राज्याला कोळसा आणि वीज संकटाचा सामना करावा लागत आहे कारण काही प्रकल्पांमध्ये केवळ दी़ड दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. मात्र, वीज संकट दूर करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाहीही नितीन राऊतांनी दिली. अर्थात ते दावा करत असले तरी बऱ्याच वर्षांनंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरील भारनियमनामुळे ऐन उन्हाळ्यात प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच वीजेअभावी सामान्य माणसांप्रमाणेच उद्योग व्यवसाय क्षेत्रालाही फटका बसत आहे.

 

राज्यातील नेते कोळसा टंचाईसाठी केंद्राकडे बोट दाखवत असले तरी भाजपा नेते केंद्राने सावध करूनही कोळसा व्यवस्था न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं सांगत राज्य सरकारलाच दोष देत आहेत. त्यात एक आरोप अर्थमंत्री अजित पवारांकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खात्याला सहकार्य मिळत नसल्याचाही आहे. केंद्राचे २२०० कोटी महाराष्ट्राने आजवर दिलेले नाहीत. तर आघाडी समर्थक केंद्राकडे त्याच्या कित्येक पट जास्त जीएसटी वाटा केंद्राने थकवल्याचे सांगत वीज टंचाईसाठी कोळसा देण्याची जबाबदारी असलेले भाजपाचे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा प्रत्यारोप करत आहेत.

 

कोयना धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक! रोजची वीज निर्मितीसाठी गरज १ ए टीएमसीची!

  • राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील काही प्लांटमध्ये १.५ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे, काहींमध्ये ३ दिवसांचा आणि काहींमध्ये ६ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.
  • वीज संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
  • जलसंपदा मंत्र्यांना जलविद्युत निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यास सांगितले आहे.
  • कोयना धरणात १७ टीएमसी पाणी शिल्लक आहे, वीज निर्मितीसाठी दररोज १ टीएमसी पाणी लागते.
  • लोडशेडिंग सोडवायचे असेल तर कोळसा, पाणी आणि गॅसची गरज आहे.

केंद्राची महाराष्ट्राकडे कोळशाच्या २२०० कोटी रुपये थकबाकीची मागणी!

  • ऊर्जामंत्री राऊत म्हणाले की, केंद्राशी झालेल्या करारानुसार, राज्याला एपीएम गॅस मिळण्याचा अधिकार आहे.
  • मात्र मदतीपूर्वी केंद्र सरकार थकबाकी मागत आहे.
  • त्यांनी पुढे दावा केला की केंद्राने राज्याला आवश्यक एपीएम गॅस प्रदान केलेला नाही.
  • महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला २२०० कोटी रुपये द्यायचे आहेत.
  • त्यांना आधी पैसे द्या, मगच कोळसा देऊ, असे केंद्राने सांगितले आहे.

Tags: central govtCoalMaharashtraPower Crisisकेंद्र सरकारकोळसामहाराष्ट्रवीज संकट
Previous Post

कोल्हापूर आघाडीचं! जयश्री जाधवांचा मोठा विजय! भाजपाचे सत्यजीत कदम पराभूत!

Next Post

कोल्हापूर: चंद्रकांत जाधवांना मतांजली! सतेज पाटलांची समन्वयाची रणनीती!! आघाडीची एकी जिंकली!!!

Next Post
jayshree jadhav

कोल्हापूर: चंद्रकांत जाधवांना मतांजली! सतेज पाटलांची समन्वयाची रणनीती!! आघाडीची एकी जिंकली!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!