मुक्तपीठ टीम
चीन आता पृथ्वीवरचं युद्ध आता अंतराळात करण्याच्या तयारीत आहे. चीनने उपग्रहांचा वेध घेणारा असा आयुध तयार केलं आहे. या आयुधात कोणत्याही देशाचा उपग्रह अंतराळात नष्ट करण्याची क्षमता आहे. चीनच्या या उपग्रहामुळे काही दशकांपूर्वी अमेरिका आणि रशियामधील दीर्घकालीन शीतयुद्धादरम्यान गाजलेल्या नामांकित स्टार वॉर मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. चिनी संशोधकांनी रिलेटिव्हिस्टिक अॅम्प्लिफायर (RKA) नावाच्या अशा मायक्रोवेव्ह आयूधची रचना केली आहे, ज्यामध्ये अंतराळात असलेल्या उपग्रहांना निकामी करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता आहे.
कसं आहे चीनचं हे आयुध?
- चीनचे हे आयूध वेव्ह बर्स्ट तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्याला डायरेक्ट एनर्जी वेपन्स म्हणतात.
- ज्याच्या केए बेंडमधून बाहेर पडणाऱ्या पाच मेगावॅटच्या लहरी उपग्रहाला निकामी किंवा नष्ट करू शकतात.
- त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सर्वसाधारण आणि लष्करी वापरासाठी वाढवले किंवा कमी केला जाऊ शकतो.
- चीनचे हे आयुध उपग्रहाला जमिनीवरून नव्हे तर आकाशातूनच लक्ष्य करेल.
उपग्रहविरोधी आयुध कसं वापरतात?
- हे आयुध उपग्रहामध्येच स्थापित केला जाईल.
- वेळ आल्यावर उपग्रह अवकाशात फिरत असताना आयुधाद्वारे निवडलेल्या उपग्रहाला लक्ष्य करू शकेल.
- या यंत्रातून निघणाऱ्या घातक लहरी कोणत्याही उपग्रहातील अतिसंवेदनशील इलेक्ट्रॉनिक भाग नष्ट करतील.
- यामुळे उपग्रह निकामी होईल.
- या आयुधातून बाहेर पडणारी विद्युत चुंबकीय ऊर्जा किंवा गतिज ऊर्जा इतकी मारक असते की त्यामुळे इलेक्ट्रॉनिक भागांची राख होऊ शकते.
चीनकडून वृत्ताचे खंडन
- मात्र, चीनने अशी शस्त्रे विकसित केल्याच्या वृत्ताचे खंडन केले असून आपण असे कोणतेही आयुध बनवले नसल्याचे म्हटले आहे.
- जर ही गोष्ट सिद्ध झाली तर चीनला जागतिक समुदायाकडून तीव्र टीकेला सामोरे जावे लागू शकते. एका करारानुसार, अंतराळ हे एक क्षेत्र आहे ज्याचा वापर युद्धासाठी केला जाऊ शकत नाही.
- युद्ध झाल्यास कोणत्याही उपग्रहाचे नुकसान होऊ शकत नाही.
- परंतु जगातील काही मोठे देश ज्या पद्धतीने या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ते पाहता भविष्यातील बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
स्टार वॉर्स मालिकेची आठवण…
- चीनच्या उपग्रहविरोधी आयुधाच्या बातमीमुळे दोन देशांच्या काल्पनिक युद्धाची स्टार वॉर्स चित्रपट मालिकेची आठवण झाली.
- स्टार वॉर्स चित्रपट मालिका २५ मे १९७७ रोजी प्रदर्शित झाली.
- रियान जॉन्सन दिग्दर्शित, चित्रपटाची सुरुवात एका आश्चर्यकारक अंतराळ युद्धाच्या दृश्याने होते.
- ही मालिका अमेरिका आणि रशिया दरम्यान शीतयुद्धाच्या जागतिक वातावरणात अधिकच गाजली होती.