Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुमारे २०० कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा! महाराष्ट्र जीएसटीकडून दोन व्यापाऱ्यांना अटक!

March 19, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Mantralay

मुक्तपीठ टीम

खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल नुकसान करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.

 

खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय १९७ कोटी रुपयांची बनावट बीजक देऊन आणि २९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून २९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल नुकसान केले आहे.

 

या दोन्ही प्रकरणांमध्ये हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून प्रमोद कातरनवरे हे ही महसूल नुकसानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. २८ मार्च २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीकांत पवार हे राज्यकर उपआयुक्त प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी सहआयुक्त अन्वेषण कर अनिल भंडारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, या कार्यवाहीसाठी सुजित पाटील, प्रशांत खराडे, विद्याधर जगताप, सुमेधकुमार गायकवाड, रंजित हातोले आणि लीनता चव्हाण, सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त हे सहभागी होते. सलग दोन महिन्यांच्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे एका पत्रकाव्दारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.


Tags: GSTMaharashtramaharashtra goods and services tax departmentMaharashtra govtजीएसटीमहाराष्ट्रमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागमहाराष्ट्र सरकार
Previous Post

मोदी युगानंतर भाजपा विस्कटणार, काँग्रेसचे खरंच अच्छे दिन येणार? काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी!

Next Post

चीनचं नवं खतरनाक आयुध! कोणत्याही देशाचा उपग्रह नष्ट करण्याची क्षमता!!

Next Post
China

चीनचं नवं खतरनाक आयुध! कोणत्याही देशाचा उपग्रह नष्ट करण्याची क्षमता!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!