मुक्तपीठ टीम
शिवसेना विरूद्ध भाजपा या सततच्या राजकीय युद्धात आता नवी लढाई सुरु झाली आहे ती संजय राऊत विरुद्ध प्रमोद महाजन या दोन खासदारांमध्ये. संजय राऊतांनी जुनं व्यंगचित्र ट्वीट करत “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट…” असं लिहिलं. त्यात स्व. बाळासाहेब ठाकरे थाटात बसलेले तर स्व. प्रमोद महाजन हे उभे असलेले दाखवलेले होते. खरंतर हे जुनं तत्कालीन राजकीय परिस्थितीत गाजलेलं व्यंगचित्र आता दोन्ही नेते हयात नसल्याच्या परिस्थितीत पूनम महाजन यांना चांगलंच झोंबलं. त्यांनी राऊतांना “नामर्दासारखं कार्टून काढू नका” असं कडक प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही वेळातच संजय राऊतांनी त्या व्यंगचित्राचे ट्वीट डिलीट केले. राऊतXमहाजन लढाईची पहिली फेरी पूनम महाजनांनी जिंकली.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्यानंतर राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र पोस्ट करत भाजपावर टीका केली. त्यांच्या शब्दांएवढेच व्यंगचित्रात प्रमोद महाजनांना बाळासाहेबांसमोर कसंबसं उभं राहिलेलं दाखवलेलं असणं बहुधा प्रमोद महाजनांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांना खुपलं. त्यांनी राऊतांना कडक उत्तर दिलं, “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.” त्यानंतर राऊतांनी स्वत:चे ट्वीट डिलीट केले.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub— Poonam Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022
काय होतं राऊतांचं ट्वीट?
- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं एक व्यंगचित्र ट्वीट करून भाजपाला फटकारले.
त्या ट्विटमध्ये “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट…”असं लिहिलं होतं. - संबंधित ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत आहे.
- शिवसेना प्रमुखांचे पाय पुढच्या एका खुर्चीवर असून ते “हॅव अ सीट” असं विचारत असल्याचं वर लिहिण्यात आलं आहे.
- बाजूला एक छोट स्टूल देखील दिसून येतं.
- समोर प्रमोद महाजन हे जागावाटपाच्या चर्चेसाठी आल्याचे व्यंगचित्रात दिसून येतं.
पूनम महाजन यांचा पलटवार
- तर या ट्वीटवर भाजपच्या नेत्या भाजपा खासदार पंकजा महाजन यांनी संजय राऊत यांना ट्वीटवरच प्रत्युत्तर दिले आहे.
- “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.
- त्यानंतर काही वेळांनी संजय राऊत यांनी ट्वीट डिलीट केले.