Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता संजय राऊत X पूनम महाजन! “नामर्दासारखं कार्टून काढू नका,” असं महाजनांनी सुनावताच राऊतांनी ट्वीटच डिलीट केलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena vs bjp

मुक्तपीठ टीम

शिवसेना विरूद्ध भाजपा या सततच्या राजकीय युद्धात आता नवी लढाई सुरु झाली आहे ती संजय राऊत विरुद्ध प्रमोद महाजन या दोन खासदारांमध्ये. संजय राऊतांनी जुनं व्यंगचित्र ट्वीट करत “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट…” असं लिहिलं. त्यात स्व. बाळासाहेब ठाकरे थाटात बसलेले तर स्व. प्रमोद महाजन हे उभे असलेले दाखवलेले होते. खरंतर हे जुनं तत्कालीन राजकीय परिस्थितीत गाजलेलं व्यंगचित्र आता दोन्ही नेते हयात नसल्याच्या परिस्थितीत पूनम महाजन यांना चांगलंच झोंबलं. त्यांनी राऊतांना “नामर्दासारखं कार्टून काढू नका” असं कडक प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही वेळातच संजय राऊतांनी त्या व्यंगचित्राचे ट्वीट डिलीट केले. राऊतXमहाजन लढाईची पहिली फेरी पूनम महाजनांनी जिंकली.

cartoon

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्यानंतर राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र पोस्ट करत भाजपावर टीका केली. त्यांच्या शब्दांएवढेच व्यंगचित्रात प्रमोद महाजनांना बाळासाहेबांसमोर कसंबसं उभं राहिलेलं दाखवलेलं असणं बहुधा प्रमोद महाजनांच्या कन्या खासदार पूनम महाजन यांना खुपलं. त्यांनी राऊतांना कडक उत्तर दिलं, “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.” त्यानंतर राऊतांनी स्वत:चे ट्वीट डिलीट केले.

 

स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub

— Poonam Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022

काय होतं राऊतांचं ट्वीट?

  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं एक व्यंगचित्र ट्वीट करून भाजपाला फटकारले.
    त्या ट्विटमध्ये “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट…”असं लिहिलं होतं.
  • संबंधित ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत आहे.
  • शिवसेना प्रमुखांचे पाय पुढच्या एका खुर्चीवर असून ते “हॅव अ सीट” असं विचारत असल्याचं वर लिहिण्यात आलं आहे.
  • बाजूला एक छोट स्टूल देखील दिसून येतं.
  • समोर प्रमोद महाजन हे जागावाटपाच्या चर्चेसाठी आल्याचे व्यंगचित्रात दिसून येतं.

 

पूनम महाजन यांचा पलटवार

  • तर या ट्वीटवर भाजपच्या नेत्या भाजपा खासदार पंकजा महाजन यांनी संजय राऊत यांना ट्वीटवरच प्रत्युत्तर दिले आहे.
  • “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.
  • त्यानंतर काही वेळांनी संजय राऊत यांनी ट्वीट डिलीट केले.


Tags: BJPPoonam Mahajanpramod mahajansanjay rautShivsenaपूनम महाजनप्रमोद महाजनबाळासाहेब ठाकरेभाजपाशिवसेनासंजय राऊत
Previous Post

अहमदनगरच्या मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये विविध पदांवर भरती

Next Post

भाजपा प्रदेश ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रकोष्ठ तर्फे वक्तृत्व स्पर्धा

Next Post
elocution competition by BJP Beti Bachao Beti Padao cell

भाजपा प्रदेश 'बेटी बचाओ बेटी पढाओ' प्रकोष्ठ तर्फे वक्तृत्व स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!