मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक क्षेत्रातील अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा निधन झालं. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीत शोककळा पसरली आहे. वैकुंठ स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
किर्ती शिलेदार यांती मराठी रंगभूमीतील किर्ती
- किर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठई अमूलाग्र योगदान दिलं आहे.
- कीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म पुणे येथे १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला.
- कीर्ती शिलेदार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी साहित्य शाखेच्या पदवी घेतली होती.
- वयाची साठ वर्षे रंगभूमीसाठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या.
- वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते.
- त्यांनी संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.
- अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
कीर्ती शिलेदारांचे साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग
- कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत.
- देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.
- संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला.
- कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली
संगीत रंगभूमीची व्रतस्थ शिलेदार
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.
शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.