मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र शासनाने खोपटा नव नगर अधिसूचित ३२ गावांचा समावेश असलेल्या क्षेत्रासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, सिडकोने सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी व सुविधांनी परिपुर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याच्या इराद्याची सूचना प्रसिध्द् करण्यात आलेली आहे.
खोपटा नवनगर अधिसुचित क्षेत्राच्या विकासाचे उद्दिष्ट पायाभूत आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे व विकासाच्या विविध क्षेत्रात संधी निर्माण करणे आहे. एकात्मिक प्रोत्साहनार्थ विकास नियंत्रण नियमावली (UDCPR) नुसार खोपटा क्षेत्रातील 6 गावांचा मंजूर विकास आराखडा तसेच उर्वरित २६ गावांचा विकास आराखडा परस्पर सुसंगत असावा, यासाठी 26 गावांचा विकास आराखडा तयार करत असतांना ६ गावांच्यामंजूर असलेल्या विकास आराखड्याची फेरतपासणी करुन त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई व नैना क्षेत्राच्या मधोमध वसणा-या खोपटा अधिसुचित क्षेत्राचा नव्याने तयार झाल्यानंतर तेथे
उत्तम विकास होईल व परिसर सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी सुविधांनी परिपूर्णरित्या विकसित झाल्यावर सुनियोजित शहर म्हणून नावारुपास येईल. त्याचप्रमाणे यामुळे विविध क्षेत्रात विकासाच्या सुवर्णसंधी उपलब्ध होतील. खोपटा नव शहर अधिसूचित क्षेत्र व नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसुचित क्षेत्र (नैना) या दोन वेगळ्या प्रकल्पाकरिता शासनाने सिडकोस विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
खोपटा अधिसूचित क्षेत्राचा विकास आराखड्याचे नियोजन करण्याकरिता सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या गावांची आवश्यक अद्यावत माहिती पुरविण्याची विनंती करण्यात आलेली आहे, जेणेकरुन विकास आराखड्याचे नियोजन त्या अनुषंगाने तयार करता येईल. शहराचा विकास आराखडा तयार करतांना अस्तित्वातील असलेल्या गावांची वाढ लक्षात घेऊनच नियोजन करण्यात येईल. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या अधिनियमाप्रमाणे खोपटा अधिसुचित
क्षेत्राचा विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावली निर्धारित कालावधीत तयार करून विविध टप्प्यावर जनतेकडून सुचना व हरकती मागविण्यात येतील व सदर सुचनांवर योग्य तो विचार करून शासनास मंजूरीकरिता सादर करण्यात येईल.
विकास आराखडा मंजूर केल्यानंतरच पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचे धोरण निश्चित केले जाईल.