Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

योगी आदित्यानाथांसाठी समाजवादी नेत्याने केले गोरखपूरचे तिकीट बुक!

अद्याप मतदान नाही, निकाल नाही, पण समाजवादी नेत्याची घाई!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
IP Singh

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला तर शेवटच्या टप्प्याचे मतदान ७ मार्चला होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सपाच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. राज्यात भाजपचे सरकार जाणार असून सपाचे सरकार येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवांपासून सर्व सपा नेते करतात. त्यातील एका नेत्याने तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निकालाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीचे ११ मार्चचे गोरखपूरला जाणारे फ्लाइट तिकिटही बुक करून ठेवले आहे.

 

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री आयपी सिंह यांनी लखनऊहून गोरखपूर या योगी आदित्यनाथांच्या मतदारसंघात जाण्याचे तिकिट बुक केले आहे. हे तिकिट त्यांनी योगी आदित्यनाथांच्या नावावरच बुक केले आहे. आयपी सिंग अनेकदा आपल्या ट्वीटद्वारे भाजप सरकारवर हल्लाबोल करतात. यावेळी ते मुख्यमंत्री योगींच्या फ्लाइट बुकिंगच्या फोटोसह केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहेत.

 

ट्विटरद्वारे भाजपावर केलेला हल्लाबोल

  • सपाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी ट्विट करून सांगितले की, १० मार्च हा दिवस जनतेचा दिवस असेल.
  • १० मार्च रोजी राज्यात सत्याचा सूर्य उगवेल आणि सपा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल.
  • यामुळेच मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ११ मार्च रोजी लखनौ ते गोरखपूरचे परतीचे तिकीट बुक केले आहे. असे आयपी सिंह म्हणाले.
  • ते पुढे म्हणाले, हे तिकीट सांभाळा, कारण पराभवानंतर भाजपही तुम्हाला विचारणार नाही.

 

ट्विटरवर आयपी सिंहांवर हल्लाबोल

  • तुम्ही स्वत:चे लखनऊचे तिकिट बुक करा. तुम्हाला स्टेजवर जागा मिळणार नाही, पण शपथ पाहायला आणि ऐकायला मिळेल.
  • बसने पाठवण्याच्या लायकीचे ही नाही. तुम्ही उगाच खर्च केलात.
  • माझ्यासाठीही तिकीट बुक करा, अखिलेशजी हरल्यानंतर त्यांना भेटायला जावे लागेल.
  • तिकीट बुक केल्याबद्दल धन्यवाद! योगीजी त्याच दिवशी त्याच तिकिटावर गोरखपूरच्या मंदिरात जाऊन पाया पडतील आणि आशीर्वाद घेतील.

Tags: Assembly electionsBJPChief Minister Yogi AdityanathIP Singhsamajwadi partySamajwadi Party National Spokesperson and former Minister IP SinghtwitterUttar Pradeshआयपी सिंहउत्तर प्रदेशट्विटरभाजपमुख्यमंत्री योगी आदित्यानाथविधानसभा निवडणुकसमाजवादी पक्षसमाजवादी पक्ष राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री आयपी सिंह
Previous Post

पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता? तरुण मतदारांचीही असणार महत्वाची भूमिका!

Next Post

नवी मुंबई परिसरात आणखी एक नवं शहर! खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्र विकास आराखड्याची तयारी

Next Post
CIDCO

नवी मुंबई परिसरात आणखी एक नवं शहर! खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्र विकास आराखड्याची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!