मुक्तपीठ टीम
सिक्युरिटीज् अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये जनरल या पदासाठी ८० जागा, लीगल या पदासाठी १६ जागा, आयटी या पदासाठी १४ जागा, रिसर्च या पदासाठी ७ जागा, अधिकृत भाषा या पदासाठी ४ जागा अशा एकूण १२० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
१) जनरल- कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा एलएलबी किंवा इंजिनीअरिंग पदवी किंवा सीए/ सीएफए/ सीएस/ सीडब्ल्यूए
२) लीगल- एलएलबी
३) आयटी- बीई (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा एमसीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/ आयटी)
४) रिसर्च- सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन (वित्त)/ इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी
५) अधिकृत भाषा- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत/ इंग्रजी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी सिक्युरिटीज् अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sebi.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.