मुक्तपीठ टीम
खारघरचे सेंट्रल पार्क १० फेब्रुवारीपासून पुन्हा खुले होणार आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १ महिन्यांपासून सेंट्रल पार्क उद्यान बंद होते. आता ते उघडण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सेंट्रल पार्कमध्ये विरंगुळ्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना हा निर्णय सुखावणारा ठरणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी २२ मार्च २०२० पासून केंद्र व राज्य शासनातर्फे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदी अंतर्गत उद्यानांसारखी सार्वजनिक ठिकाणेही बंद करण्याचे निर्देश दिले गेले असल्याने गेल्या सुमारे ११ महिन्यांपासून सेंट्रल पार्क उद्यानही नागरिकांकरिता बंद करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत कोरोनाचा कमी होत असलेला संसर्ग आणि शासनाच्या अनलॉक प्रक्रिये अंतर्गत प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार सेंट्रल पार्क उद्यान खुले करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.
सेंट्रल पार्कसारखे निसर्गसंपन्न, मनोरंजन, जॉगिंग इ. सोयी
सुविधांनी युक्त असणारे उद्यान खुले होणार असल्याने खारघर परिसरातील नागरिकांना या निर्णयाचा निश्चितच फायदा होणार आहे.
सेंट्रल पार्कमध्ये येण्यासाठी अटी
- नागरिकांनी मास्क वापरावे
- सामाजिक अंतराचे पालन करावे
- कोरोना सुरक्षाविषयक नियमांचे पालन करावे
पाहा व्हिडीओ