मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप नेहमी नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो आणि प्रत्येक अपडेटमध्ये काहीतरी वेगळ असतं. व्हॉट्सअॅपचा नवीन अपडेट आता या सर्वाधिक लोकप्रिय मॅसेजिंग अपचा लेआउटबद्दल असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे. या नवीन अपडेटनंतर, व्हॉट्सअॅप युजर्स मीडिया फाइल पाठवण्यापूर्वी एडिट करु शकतील. या आठवड्याच्या सुरुवातीला WhatsApp ने Novi Digital Wallet सोबत भागीदारी केली. या भागीदारीनंतर, युजर्सना अॅपमध्येच पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा मिळाली आहे, ती सध्या फक्त यूएससाठी उपलब्ध आहे. लवकरच जगभरातील अन्य यूजर्सनाही हे अपडेट्स मिळतील.
कसा असणार नवा अपडेटेड व्हॉट्सअॅप?
- व्हॉट्सअॅपच्या फीचरला ट्रैक करणारा WABetaInfo ने दिलेल्या माहिती नुसार हे फीचर अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन २.२१.२५.१९ वर दिसले आहे.
- ट्रॅकरने नवीन फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे ज्यामध्ये नवीन मीडिया एडिटर मेनू दिसण्याची शक्यता आहे.
- यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या नवीन लेआउट Android च्या बीटा वर्जन २.२१.२५.६ वर दिसला हेता, हे फीचरदेखील प्रत्येकासाठी केव्हा उपलब्ध केले जाईल याची अजून माहिती समोर आलेली नाही.
फिचरसाठी अन डूचं फिचर!
- व्हॉट्सअॅप आणखी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. ज्याचे नाव Undo फीचर आहे जे स्टेटससाठी असेल.
- व्हॉट्सअॅपच्या Undo फीचरची चाचणी Android च्या बीटा अॅपवर केली जात आहे, ज्याचा वर्जन २.२२.२२.५ आहे.
- अनडू फीचरच्या मदतीने यूजर्स चुकून पोस्ट केलेले स्टेटस डिलीट करू शकतील, ज्यासाठी काही सेकंदांचा अवधी लागेल.