मुक्तपीठ टीम
मागील वर्षी तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रातील व्यापारी नौकांवर मोठी जिवीत आणि वित्तहानी झाली होती. यावेळी नौदलानेच बचावकार्य राबवून शेकडो खलाशांचे जीव वाचवले होते. अशा घटना टाळण्याबाबत शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने नौदल अधिकारी यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिका-यांची समिती नेमली होती. या सर्व समितीने सर्व मुद्यांचा अभ्यास करून, केंद्राला शिफारशी केल्या आहेत. त्या शिफारशींवर विचार सुरु असल्याची माहितीही यावेळी वरिष्ठ नौदल अधिका-यांनी दिली.
अत्याधुनिक क्षेपणास्त्रवाहू नौका, ३७ नौकांची भारतात
आता नव्या अत्याधुनिक वेगवान क्षेपणास्त्रवाहू नौका लौकरच नौदलात सहभागी होतील. त्या कराचीवर हल्ला करणा-या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांप्रमाणेच आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. दीर्घकालीन धोरणानुसार नौदलाचा विस्तार सुरू आहे. सध्या ३९ लहानमोठ्या नौकांचे बांधकाम सुरु आहे. त्यातील ३७ नौकांची निर्मिती भारतात होत आहेत. आत्मनिर्भर धोरणानुसार यात खासगी कंपन्यांनाही सहभागी करून घेतले जात आहे, असेही सिंह म्हणाले.
तिन्ही सेनादलांचा ‘ पश्चिम लहर’ संयुक्त युद्धसराव
आधुनिक युद्धतंत्रामध्ये तीनही सेनादांनी समन्वय ठेऊन केलेली कारवाई महत्वाची ठरते. त्यासाठी अरबी समुद्रात पुढीलवर्षी ‘ पश्चिम लहर’ हा मोठा युद्धसराव होईल. यात नौदलासह, तटरक्षक दल, सेनादल व हवाईदल सहभागी होतील, असेही सिंह यांनी सांगितले.
सन १९७१ च्या युद्धात भारताच्या गौरवशाली विजयाच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ ‘स्वर्णिम विजय वर्ष’ उत्सवाविषयीही त्यांनी सांगितले. त्यामुळे नौदल दिवस आणखी खास झाला आहे, असेही ते म्हणाले.