Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गलवान पेचप्रसंगातही नौदलाने वठवली होती महत्वाची भूमिका!

December 5, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष, सरकारी बातम्या
0
indian navy

मुक्तपीठ टीम

गलवान पेचप्रसंगात भारतीय नौदलाने वेगळ्या प्रकारे चिनी नौदलावर दडपण आणले होते. त्याचे प्रतिबिंब दोन देशांमधील चर्चेत उमटले होते. चिनी युद्धनौका भारताच्या सागरी हद्दीच्या आसपास येत असल्या तरी भारतीय नौदलाचे त्यांच्याकडे कसून लक्ष असते. त्याची जाणीवही त्यांना करुन दिली जात आहे. पाकिस्तानकडे आतापर्यंत अपु-या आणि जुन्या युद्धनौका होत्या. मात्र आता त्यांनी मिळतील तेथून नव्या युद्धनौका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांचेही नौदल वाढत असून त्यांच्या युद्धनौकांवर हेलिकॉप्टरही तैनात केली जात आहेत. भारतीय नौदलाची धोरणे ठरविताना या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात, असेही अजेंद्र सिंह यांनी हा मुद्दा अधोरेखित केला.

 

पाकिस्तानचा अमली पदार्थांच्या व्यापारात मोठा हात असून, जमिनीवरून हा व्यापार न होता सोप्या समुद्रमागार्ने केला जात आहे. भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय सहकार्य धोरण अवलंबून हा व्यापार रोखण्याची सुरुवात केली आहे. मच्छिमारांनाही प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु असून, सागरी सुरक्षेला असलेले अन्य धोके निष्प्रभा करण्यात येणार आहेत. त्याकरीता विविध प्रकारे टेहळणी होत आहे, असे ते म्हणाले.

 

भारतीय नौदल ही सागरी क्षेत्रात एक मजबूत शक्ती आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला. आम्ही समुद्रात जे काही आॅपरेशन केले, त्याचा जमिनीच्या सीमेवर निश्चित परिणाम झाला आणि त्यानंतर चर्चा झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खो-यात चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत एका कर्नलसह भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले होते.

 

त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, गलवान संघषार्नंतर नौदलाच्या भूमिकेबद्दल तपशीलवार विचारले असता, व्हाइस अ‍ॅडमिरल सिंग यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. ‘ मला वाटते की भारतीय नौदल ही सागरी क्षेत्रात एक मजबूत शक्ती आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला. आम्ही समुद्रात जे काही आॅपरेशन केले, त्याचा जमिनीच्या सीमेवर निश्चित परिणाम झाला आणि त्यानंतर चर्चा झाली.

 

व्हा. अ‍ॅडमिरल सिंग त्यावर म्हणाले की, “असू देत. वेळ आल्यावर कळेल. तपशीलांबद्दल आम्ही नंतर बोलू शकतो यापैकी काही तपशील गोपनीय आहेत, म्हणून मला येथे चर्चा करायला आवडणार नाही. पण अर्थातच, भारतीय नौदलाने सागरी क्षेत्रात एक मोठा प्रयत्न केला होता, ज्याचा इतरत्र होणा-या वर्तनावर आणि परस्पर संवादावर निश्चित परिणाम झाला होता.”

 

व्हाईस अ‍ॅडमिरल सिंग यांनी सांगितले की, हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणात चिनी नौका कार्यरत आहेत. यामध्ये युद्धनौका, संशोधन जहाजे, पाण्याखालील सर्वेक्षण जहाजे यांचा समावेश आहे. भारतीय नौदल हिंदी महासागर क्षेत्रातील प्रत्येक चिनी नौकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या देखरेखीसाठी भरपूर मालमत्तांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बोईंगने भारतीय नौदलासाठी तयार केलेली ‘पी ८ आय ’ही लांब पल्ल्याची, बहु-मिशन सागरी गस्ती विमाने अलीकडेच समाविष्ट केल्याने या दिशेने मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Previous Post

चीनी- पाक नौदलांच्या सहकार्य चिंतेचा विषय, पण भारतीय नौदल सतत सतर्क आणि सज्ज!

Next Post

चक्रीवादळ असो वा अन्य नैसर्गिक आपत्ती…भारतीय नौदल सतत भारतीयांसोबत!

Next Post
indian navy

चक्रीवादळ असो वा अन्य नैसर्गिक आपत्ती...भारतीय नौदल सतत भारतीयांसोबत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!