मुक्तपीठ टीम
देशात लवकरच डिजिटल अॅड्रेस कोड (DAC) सुरु होणार आहे. यामध्ये व्यक्तीच्या पत्त्याचा आधार लिंक युनिक कोड असेल. ज्यामुळे भविष्यात ऑनलाइन डिलिव्हरीसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी मदत होणार आहे. या कोडमध्ये डिजिटल नकाशे देखील पाहता येणार आहेत.
कधीकधी कुरिअर किंवा डिलिव्हरी बॉयला अचूक पत्ता कळूनही योग्य ठिकाणी पोहोचता येत नाही. अशा वेळी गुगल मॅपचीही मदत होत नाही. त्यावर कायम स्वरूपी उपाय म्हणजे लवकरच सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक युनिक कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा कोड टाइप करून किंवा क्यूआर कोडप्रमाणे स्कॅन करून, तुम्हाला घराचे अचूक स्थान मिळू शकेल. अशाप्रकारे, तुमची अनेक कामे पत्ता प्रत्यक्षात न लिहिताही या कोडच्या मदतीने पूर्ण होतील. या कोडमध्ये डिजिटल नकाशे देखील पाहता येतील.
डीएसी बनवण्याच्या पायऱ्या
- सध्या भारतात सुमारे ७५ कोटी घरे आहेत. त्यामुळे अचूक पत्त्यावर पोहोचणे कठीण आहे.
- या सर्व घरांसाठी एक डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल.
- डीएसी प्रत्येक पत्त्यासाठी डिजिटल प्रमाणीकरण करेल.
- डिजिटल अॅड्रेस कोड निर्माण करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची अनोखी ओळख करून दिली जाईल.
- पत्ता भू-स्थानिक निर्देशांकांशी जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येकाचा पत्ता नेहमी रस्त्यावर किंवा शेजारच्य विशिष्ट जागे वरून नाही तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकतो.
- हा कोड कायमस्वरूपी कोड असेल.
डीएसीची कार्यपद्धती
- पोस्ट ऑफ कम्युनिकेशन्स विभागाकडून या प्रस्तावावर आधीच अभिप्राय मागविण्यात आले होते.
- ज्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर रोजी संपली.
- अशा परिस्थितीत लवकरच प्रत्येक घरात डिजिटल युनिक कोड असेल.
- युनिक कोड पिन कोडची जागा घेईल.
- हे प्रत्येक घरासाठी डिजिटल समन्वय म्हणून काम करेल.
- नवीन प्रणालीमध्ये प्रत्येक घराला वेगळा कोड असेल. म्हणजेच एका इमारतीत ५० फ्लॅट असतील तर प्रत्येक फ्लॅटला वेगळा कोड असेल.
- दुसरीकडे, जर दोन कुटुंब एका घराच्या दोन मजल्यावर राहत असतील तर दोन कोड तयार होतील.
डीएसीचा फायदा
- प्रत्येक घराचा पत्ता ऑनलाइन पडताळता येतो. बँकिंग, विमा, टेलिकॉमचे ई-केवायसी सुलभ केले जाईल.
- ई-कॉमर्ससारख्या सेवेसाठी डीएसी खूप उपयुक्त ठरू शकते.
- सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी डीएसी खूप मदत करेल.
- फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
- मालमत्ता, कर आकारणी, आपत्ती व्यवस्थापन आणि जनगणना आणि लोकसंख्या नोंदी तयार करण्यात उपयोगी ठरणार.
- डीएसी वन नेशन वन अॅड्रेसचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल.