Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात लवकरच डिजिटल अॅड्रेस कोड सेवा! पत्त्यासाठी फक्त कोड स्कॅन करा!!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
DAC service

 मुक्तपीठ टीम

देशात लवकरच डिजिटल अॅड्रेस कोड (DAC) सुरु होणार आहे. यामध्ये व्यक्तीच्या पत्त्याचा आधार लिंक युनिक कोड असेल. ज्यामुळे भविष्यात ऑनलाइन डिलिव्हरीसह अनेक प्रकारच्या सुविधांसाठी मदत होणार आहे. या कोडमध्ये डिजिटल नकाशे देखील पाहता येणार आहेत.

 

कधीकधी कुरिअर किंवा डिलिव्हरी बॉयला अचूक पत्ता कळूनही योग्य ठिकाणी पोहोचता येत नाही. अशा वेळी गुगल मॅपचीही मदत होत नाही. त्यावर कायम स्वरूपी उपाय म्हणजे लवकरच सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक युनिक कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा कोड टाइप करून किंवा क्यूआर कोडप्रमाणे स्कॅन करून, तुम्हाला घराचे अचूक स्थान मिळू शकेल. अशाप्रकारे, तुमची अनेक कामे पत्ता प्रत्यक्षात न लिहिताही या कोडच्या मदतीने पूर्ण होतील. या कोडमध्ये डिजिटल नकाशे देखील पाहता येतील.

 

डीएसी बनवण्याच्या पायऱ्या

  • सध्या भारतात सुमारे ७५ कोटी घरे आहेत. त्यामुळे अचूक पत्त्यावर पोहोचणे कठीण आहे.
  • या सर्व घरांसाठी एक डिजिटल युनिक कोड तयार केला जाईल.
  • डीएसी प्रत्येक पत्त्यासाठी डिजिटल प्रमाणीकरण करेल.
  • डिजिटल अॅड्रेस कोड निर्माण करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची अनोखी ओळख करून दिली जाईल.
  • पत्ता भू-स्थानिक निर्देशांकांशी जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येकाचा पत्ता नेहमी रस्त्यावर किंवा शेजारच्य विशिष्ट जागे वरून नाही तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकतो.
  • हा कोड कायमस्वरूपी कोड असेल.

 

डीएसीची कार्यपद्धती

  • पोस्ट ऑफ कम्युनिकेशन्स विभागाकडून या प्रस्तावावर आधीच अभिप्राय मागविण्यात आले होते.
  • ज्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर रोजी संपली.
  • अशा परिस्थितीत लवकरच प्रत्येक घरात डिजिटल युनिक कोड असेल.
  • युनिक कोड पिन कोडची जागा घेईल.
  • हे प्रत्येक घरासाठी डिजिटल समन्वय म्हणून काम करेल.
  • नवीन प्रणालीमध्ये प्रत्येक घराला वेगळा कोड असेल. म्हणजेच एका इमारतीत ५० फ्लॅट असतील तर प्रत्येक फ्लॅटला वेगळा कोड असेल.
  • दुसरीकडे, जर दोन कुटुंब एका घराच्या दोन मजल्यावर राहत असतील तर दोन कोड तयार होतील.

 

डीएसीचा फायदा

  • प्रत्येक घराचा पत्ता ऑनलाइन पडताळता येतो. बँकिंग, विमा, टेलिकॉमचे ई-केवायसी सुलभ केले जाईल.
  • ई-कॉमर्ससारख्या सेवेसाठी डीएसी खूप उपयुक्त ठरू शकते.
  • सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी डीएसी खूप मदत करेल.
  • फसवणुकीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
  • मालमत्ता, कर आकारणी, आपत्ती व्यवस्थापन आणि जनगणना आणि लोकसंख्या नोंदी तयार करण्यात उपयोगी ठरणार.
  • डीएसी वन नेशन वन अॅड्रेसचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करेल.

पाहा व्हिडीओ:


Tags: aadhar cardDAC serviceDigital address code serviceDigital indiaIndiamuktpeethडिजिटल इंडियाडीएसी सर्व्हिसमुक्तपीठ
Previous Post

आयआरसीटीसीचे शानदार काश्मीर एअर टूर पॅकेज, धरतीवरील स्वर्गाचा आनंद!

Next Post

भारतीय हवाई दलात कमिशंड ऑफिसरच्या ३१७ जागांवर करिअर संधी

Next Post
INDIANAIRFORCE

भारतीय हवाई दलात कमिशंड ऑफिसरच्या ३१७ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!