मुक्तपीठ टीम
भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे/ मतदारांचे नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, महिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. १३ व १४ नोव्हेंबर, २०२१ आणि दि. २७ व २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
तरी मुंबई शहर जिल्हयातील नवमतदारांनी व नागरिकांनी जवळच्या पदनिर्देशित ठिकाणी अथवा www.nvsp.in या वेबसाईट वर अथवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले आहे.