Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नोकरदार मागासवर्गीय महिलांना मुंबईतील बोरिवलीत वसतीगृह प्रवेशाची संधी

November 13, 2021
in उपयोगी बातम्या, सरकारी बातम्या
0
mantralay

मुक्तपीठ टीम 

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मागासवर्गीय महिलांचे वसतिगृह, बोरिवली या वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविणे सुरू आहे.तरी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

वसतिगृहामधील प्रवेशासाठी नियमावली पुढीलप्रमाणे

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी.
  • अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.
  • अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हददीत रहात नसावेत.अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतीगृह सोडावे लागेल.
  • काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील.त्यानंतर त्यांना निवासस्थान सोडणे अनिवार्य राहील.
  • वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी रक्कम अनामत रक्कम म्हणून वसतिगृहात व्यवस्थापकांकडे जमा करावी  लागेल.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो,ओळखपत्र (पासपोर्ट/ आधारकार्ड/संबंधित प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र) अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


Tags: Assistant Commissioner Social WelfareBackward class womenborivaliHostelबोरिवलीमागासवर्गीय महिलावसतीगृहसहायक आयुक्त समाज कल्याण
Previous Post

नवमतदारांनी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकरांचे आवाहन

Next Post

ललिता व डाॅ. श्रीपाल सबनीस यांना राष्ट्रीय ‘सावित्रीजोती’ पुरस्कार

Next Post
Shripal Sabins, Lalita Sabnis,

ललिता व डाॅ. श्रीपाल सबनीस यांना राष्ट्रीय 'सावित्रीजोती' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!