मुक्तपीठ टीम
आता वाढत्या वयाबरोबर तुम्हाला गुडघेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. आयआयटी कानपूरमध्ये झालेले संशोधन हे दिलासा देणारे आहे. शरीरात तयार होणाऱ्या हानिकारक रसायनांमुळे गुडघ्यांच्या कार्टिलेज पेशींना आणि संरचनेला होणारे नुकसान टाळण्यासाठी गुप्त मॉल्यूक्यूलचा शोध लागला आहे. मधुमेहावरील औषध मेटफॉर्मिनमुळेदेखील गुडघ्यांच्या कार्टिलेजवर दुष्परिणाम होतो. आता आयआयटीने जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजशी हातमिळवणी केली आहे ज्यामुळे गुडघ्यांच्या कार्टिलेजच्या पेशींवर मॉल्यूक्यूलच्या चाचण्या घेण्यात येतील.
- आयआयटीच्या जैविक विज्ञान आणि जैव-अभियांत्रिकी विभागाचे प्रा. धीरेंद्र एस कट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे संशोधन अभ्यासक डॉ. अर्जित भट्टाचार्य यांचे संशोधन सुरु आहे.
- २०१९ पासून पहिल्या टप्प्यात शेळ्या आणि उंदरांच्या सांध्याच्या कार्टिलेजवर मॉल्यूक्यूलच्या परिणामाचा अभ्यास केला गेला.
- तीन वर्षांच्या प्रयोगशाळेतील चाचणीच्या चांगल्या परिणामांबाबत तज्ज्ञ उत्साहित आहेत.
- आता डॉक्टर प्रग्नेश वार्ष्णेय, सहाय्यक प्राध्यापक, ऑर्थोपेडिक्स विभाग, वैद्यकीय महाविद्यालय यांच्यासह आयआयटी तज्ञांनी संधिवात उपचारासाठी मॉल्यूक्यूलची चाचणी सुरू केली आहे.
- या संशोधनाला मेडिकल कॉलेजच्या एथिक्स कमिटीने मान्यता दिली आहे.
कार्टिलेज खराब होण्याची कारणे
- शरीरात तयार होणारी इटोकाइन, फ्री रॅडिकल्स आणि मेटॅलो-प्रोटीनेस एन्झाईम्स ही हानिकारक रसायने कार्टिलेजच्या संरचनेसाठी हानिकारक असतात.
- यांच्या अधिक प्रमाणामुळे कार्टिलेजचे नुकसान होते. ज्यामुळे गुडघ्यांच्या समस्या उद्भवतात.
- मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी वापरले जाणारे मेटफॉर्मिन हे औषध देखील हानी पोहोचवते.
अशाप्रकारे चाललंय संशोधन…
- शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढण्यात आलेल्या मानवी गुडघ्यांच्या कार्टिलेजच्या पेशी वैद्यकीय महाविद्यालयातील आयआयटीच्या तज्ञांना दिले जात आहे.
- आयआयटीमधील तज्ज्ञ प्रयोगशाळेत टिश्यू कल्चर पद्धतीचा वापर करून प्रयोगशाळेत या पेशी विकसित करतील.
- त्यानंतर, तयार केलेले गुप्त मॉल्यूक्यूल त्यावर तपासले जातील की ते रसायनाचा प्रभाव किती प्रमाणात कमी करतात आणि गुडघ्यांचे कार्टिलेज पुन्हा निर्माण करण्यासाठी किती उपयुक्त आहेत.
- आतापर्यंत प्रयोगशाळेच्या चाचणीचे निकाल खूप चांगले आले आहेत.
- वैद्यकीय महाविद्यालयातून कार्टिलेज पेशींवर काम सुरू झाले आहे.
- तिसऱ्या टप्प्यात संधिवात ग्रस्त रुग्णांची थेट चाचणी केली जाईल.
आतापर्यंत १० रुग्णांवर अभ्यास झाला आहे. हा संशोधन प्रकल्प पाच वर्षे चालेल. वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञही या प्रकल्पात सहकार्य करत आहेत’.