Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शासकीय खात्यांमधील गैरसरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
bhupendra

मुक्तपीठ टीम

सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्र सरकारने केंद्रीय खात्यांसाठी काम करणाऱ्या अशासकीय कर्मचाऱ्यांनाही दिवाळीची भेट दिली आहे. कामगार मंत्रालयाने या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. त्याअंतर्गत रोजंदारी किमान ३७७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, ८६४ रुपये प्रतिदिन सर्वोच्च वेतन असेल. गेल्या काही वर्षांपासून वाढती महागाई लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.

 

दीड कोटी कामगारांना वेतन वाढीचा होणार फायदा

  • या निर्णयाचा फायदा दीड कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
  • केंद्र सरकारशी संबंधित सर्व विभाग, रेल्वे प्रशासन, खाणकाम, तेल क्षेत्र आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अशासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
  • केंद्रीय विभागांमध्ये कंत्राटी आणि प्रासंगिक तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा निर्णय लागू असेल.

 

फायदा नेमका कुणाला?

  • बांधकाम
  • रस्त्यांची देखभाल
  • धावपट्टी
  • बिल्डिंग ऑपरेशन
  • साफसफाई
  • लोडिंग-अनलोडिंग
  • खाणकाम
  • कृषी

यासारख्या केंद्रीय विभागांमध्ये अनुसूचित रोजगारांतर्गत काम करणाऱ्या दीड कोटी कामगारांना सरकारच्या या निर्णयाच्या लाभासह बरेच फायदे मिळतील.

 

कोणत्या क्षेत्रात किती किमान वेतन?

  • किमान वेतन दरात बदल करण्यात आला आहे.
  • सर्व क्षेत्रे अ, ब आणि क वर्गात विभागली आहेत.
  • कुशल, अकुशल, अर्धकुशल, उच्च-कुशल कामगारांसाठी वेगळे किमान वेतन दर असतील.
  • बांधकाम क्षेत्रातील अकुशल कामगारांना ‘अ’ श्रेणी क्षेत्रात प्रतिदिन ६५४ रुपये, ‘ब’ श्रेणी क्षेत्रात प्रतिदिन ५४६ रुपये आणि क श्रेणीतील ४३७ रुपये प्रतिदिन वेतन मिळेल.
  • उच्च-कुशल कामगारांना ‘अ’ श्रेणी क्षेत्रात ८६४ रुपये, ‘ब’श्रेणी क्षेत्रात ७९५ रुपये आणि ‘क’ श्रेणी क्षेत्रात ७२४ रुपये प्रतिदिन मानधन दिले जाईल.
  • कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अकुशल मजुरांना ‘अ’ श्रेणी क्षेत्रात प्रतिदिन ४१७ रुपये, ‘ब’ श्रेणी क्षेत्रात ३८० रुपये आणि ‘क’ श्रेणीमध्ये ३७७ रुपये रोज मिळणार आहेत.
  • खाण क्षेत्रात काम करणाऱ्यांना खाणीबाहेर काम करणाऱ्यांपेक्षा जास्त मजुरी मिळेल.
  • खाणीत काम करणाऱ्या अकुशल कामगाराला दररोज किमान ५४६ रुपये आणि उच्च कामगाराला ८५१ रुपये मिळतील.
  • खाणीच्या वर काम करणाऱ्या अकुशल कामगाराला दररोज किमान ४३७ रुपये आणि उच्च प्रशिक्षित कामगाराला ७६२ रुपये प्रतिदिन मिळतील.

Tags: government departmentsmuktpeethnon-government employeesअशासकीय कर्मचारीकेंद्रीय विभागमुक्तपीठवेतन वाढशासकीय खात्यांमधील गैरसरकारी कर्मचारी
Previous Post

आयआयटीनं शोधलं मॉल्यूक्यूल, गुडघेदुखीला आता करा राम राम!

Next Post

गुगलच्या जीमेलची स्टाइल बदलणार! जाणून घ्या नवीन फिचर्स…

Next Post
gmail

गुगलच्या जीमेलची स्टाइल बदलणार! जाणून घ्या नवीन फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!