मुक्तपीठ टीम
उत्तर मध्य रेल्वेत एकूण १,६६४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://ncr.indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.