मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा वेग मंदावला आहे. जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहीम ही देशात राबवली जात आहे. अनेकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहे. महाराष्ट्रात लसीकरण मोहीम ही वेगाने राबवली जात आहे, त्याचवेळी नागरिकांमध्ये निष्काळजीपणाचे प्रमाण हे वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना सुनावले आहे. “दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, शारीरिक अंतराचं पालन केलं पाहिजे, असं अजित पवारांनी बजावले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.
पुण्यात तीन दिवसीय लसीकरण कार्यक्रम
- पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम घेणार आहोत.
- ७५ तास लसीरकरण करण्याचा आमचा मानस आहे.
- सीएसआरमधून ५ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत.
पुण्याची स्थिती सुधारली
- पुणे महापालिकेत २.१ कोरोनाबधित रेट आहे.
- कोरोनाची मागच्यावेळी पेक्षा परिस्थिती सुधारली आहे.
- पुण्यातील मृत्युदर २.१ आला आहे.
- पिंपरीचा थोडासा मृत्युदर वाढला आहे.
दोन डोस घेतल्यानंतर बेजबाबदारपणा!
- पुण्यात मागील आठवड्यात ५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.
- नागरिक दुसरा डोस घेततयानंतर नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत.
- नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत.
- पुण्यातील सक्रीय रुग्णांमध्ये १९ टक्के घट झाली आहे.