मुक्तपीठ टीम
आयटी सर्विसमध्ये असणाऱ्या कॉग्निजंट या कंपनीत अनुभव असणाऱ्या १ लाख लोकांची भरती होणार आहे. नव्या टॅलंटला आकर्षित करण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. या वर्षी ३० हजार फ्रेशर्सची निवड आत्तापर्यंत करण्यात आली आहे. तर एप्रिलपासून जून पर्यंत ३१ टक्के कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. त्यामुळे आणखी नव्या फ्रेशर्ससह अनुभवींना कॉग्निजंटमध्ये संधी मिळणे सुरुच राहणार आहे.
कोरोना काळात एका बाजुला अनेक कंपन्यांमध्ये छाटणी होत आहे, मोठा पगार असणारे सेक्टरही संकटात सापडत आहेत. अशा परिस्थितीत कॉग्निजेंटमध्ये १ लाख प्रोफेशनल्सची भरती होणार आहे, ही दिलासा देणारी बातमी आहे. कंपनीचे सीईओ ब्रायन हमफ्रीज म्हणाले की, “कॉग्निजेंट यावर्षी स्पर्धकांविरोधात जिंकण्यासाठी प्रोफेशनल्सची भर्ती करणार आहेत. जर आपण आयटी सर्विस सेक्टरचे अनुभवी उमेदवार आहात तर ही तुमच्यासाठी लाभदायी संधी आहे.”
कॉग्निजेंटच्या या फ्रेश टॅलंट योजनेअंतर्गत उमेदवारांना स्वतःकडे खेचण्यासाठी एक नवा संघर्ष सुरु होऊ शकतो. कोरोना काळात डिजिटल मागणी जास्त वेगाने वाढत आहे. १५० अब्ज डॉलरच्या भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कंपनी उत्तम, चांगल्या उमेदवारांना संधी देऊ इच्छिते. उमेदवारांना स्वतःकडे आणण्याच्या उद्देशाने पगाराचे पॅकेज देखील मोठे दिले जाईल. तसाही अनुभवी व्यक्तींचा पगार जास्त असतो. त्यात कॉग्निजेंटच्या पावलावर इतरांनीही पाऊल टाकल्यानंतर सॅलरी पॅकेज आणखी वाढू शकतात.
या वर्षी आतापर्यंत किमान ३० हजार फ्रेशर्सची भर्ती करण्यात आली आहे. कंपनीचे नियोजन एकूण ४५ हजार प्रेशर्सची भर्ती करण्याच आहे. कॉग्निजेंटचे भारतातील डिजिटल बिजनेस आणि टेक्नॉलॉजी चेअरमन राजेश नाम्बियार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, फ्रेशर्सच्या भर्तीसोबत या वेळी येणाऱ्या मागण्या कशा पूर्ण करता येतील याकडे देखील लक्ष द्यायचे आहे. फक्त पदवीधर व्यक्तींच्या भर्तीने हे काम होणार नाही, यासाठी अनुभवी व्यक्तींचीही गरज आहे. अमेरिकेत मुख्यालय असणाऱ्या कॉग्निजेंट कंपनीमध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी २/३ एकट्या भारतातील आहेत. एप्रिल पासून जून पर्यंत ३१ टक्के कर्मचारी कंपनी सोडून गेले आहेत. त्यापैकी २९ टक्के लोकांनी स्वतःहून नोकरी सोडली आहे. मागच्या वेळी ३१ टक्के एवढी संख्या होती. कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कायम ठेवण्यासाठी ४७०० लोकांची भरती केली आहे. कॉग्निजेंटमधून नोकरी सोडणाऱ्यांची संख्या इतर कंपनीपेक्षा जास्त आहे.