मुक्तपीठ टीम
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यसरकारने ऑनलाईन शिक्षणपद्धतीस मान्यता दिली. मात्र सर्वांनाच ऑनलाईन शिक्षण सोयीचे आहे असे नाही. ऑनलाईन शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच ऑनलाईन शिक्षण घेण्यास येणाऱ्या अडचणींमुळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस)च्या विदर्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन व्याख्यानांवर बहिष्कार टाकला आहे. आंबेडकर विद्यार्थी संघटनेने टीआयएसएसच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानांवर बहिष्कार टाकण्यास आवाहन केले आहे.
टीसच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. ऑनलाईन शिक्षणादरम्यान घरबसल्या शिक्षण घेणे अवघड असल्याने महाविद्यालय सुरू करण्याची मागणी ‘टीआयएसएस’च्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमने विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करुन विद्यार्थी समस्येचे निराकरण करणार असल्याचे सांगितले आहे.
- राज्यातील विविध भागातील विद्यार्थी टीआयएसएस शिक्षण संस्थेत प्रवेश घेतात.
- तसेच अनेक विद्यार्थी टीआयएसएसमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असतात मात्र त्यांना समान पातळीवर प्रवेश दिला जात नाही.
- एएसएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, महाविद्यालयामध्ये कोणत्याही सुखसुविधा विद्यार्थ्यांना पुरविल्या जात नसून विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारले जात आहे.
- ग्रंथालय, क्षेत्ररक्षण आणि वैद्यकिय विमा शुल्कदेखील आकारण्यात आले आहे.
- पीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला ईमेल केले आहेत.
- आम्हाला प्रत्येकाला उत्तर देणे शक्य झाले नाही. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
- प्रा. आशा बानू म्हणाले की, प्रशासनाच्या सुचनेनुसार महाविद्यालयाचे कॅम्पस पुन्हा सुरू करण्यात येईल.
- तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्याबाबत समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून कळला त्रास
- शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या अनेक बदलांमुळे ७३.७ टक्के विद्यार्थी अनारोग्याच्या तक्रारींनी त्रस्त आहेत.
- २७ टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. ५० टक्के विद्यार्थी हे मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
- तसेच या विद्यार्थ्यांना इंटरनेटची गुणवत्ता कमी असल्यामुळे शिक्षणात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.
- ३८ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणासाठीचे सोयीचे वातावरण नाही.
- तर ४९ टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठीची सामग्री उपलब्ध नाही.