Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाकरे सरकारने अटी बदलल्याने लाखो शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ!”

भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांची टीका

July 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
Anil bonde

मुक्तपीठ टीम

महाआघाडी सरकारने पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर अटी तयार केल्याने राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. ठाकरे सरकारवर विश्वास नसल्यानेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांची पीक विमा काढण्याची इच्छाच राहिलेली नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

 

प्रसिद्धीपत्रकात डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे की, यावर्षी राज्य सरकारने पीक विमा काढण्यासाठीची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविली असूनसुद्धा यावर्षी ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा काढला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते आहे.

 

महाआघाडी सरकारने पीक विमा कंपन्यांना फायदेशीर ठरतील अशा अटी बनवल्याने आपल्याला विमा कंपन्यांकडून भरपाई मिळेल अशी खात्री शेतकऱ्यांना वाटेनाशी झाली आहे. महाआघाडी सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नसल्यानेच लाखो शेतकरी पीक विमा काढण्याचे धाडस करू इच्छित नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना २०१९-२० या वर्षी ८५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी भरपाई मिळाली होती. त्यावर्षी पीक विमा कंपन्यांना १ हजार कोटींचा तोटा झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने पीक विमा कंपन्यांशी तीन वर्षांसाठी उंबरठा उत्पादन गोठवून करार केल्याने मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळू शकली नाही.

 

मागील वर्षी फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७५ कोटी रु. ची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळाली. विमा कंपन्यांना मागील वर्षी ४ हजार कोटींहून अधिक नफा मिळाला. गेल्या वर्षी पीक विमा काढूनही उपयोग न झाल्यानेच ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा काढलाच नाही. अतिवृष्टी, पूर यासारख्या कारणांमुळे पिकांचे वारंवार नुकसान होत असतानाही ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ठाकरे सरकारवर विश्वास राहिला नसल्यानेच पीक विमा काढला नाही, असेही डॉ. बोंडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

 


Tags: Anil bondeBJPchief minister uddhav thackeraycrop insurancefarmersMahavikas Aghadi governmentडॉ. अनिल बोंडेभाजप किसान मोर्चा
Previous Post

अखेर ‘टीआयएसएस’ विद्यार्थ्यांचा संयम संपला…ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार!

Next Post

“पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा व स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा व स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!