मुक्तपीठ टीम
आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच आयडीसीने एक नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार २०२१च्या अखेरपर्यंत भारताची सॉफ्टवेअर क्षेत्रातील उलाढाल ५६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सन २०२० मध्ये भारताची सॉफ्टवेअर उलाढाल अंदाजे ५२ हजार कोटी होते, जी २०१९ च्या तुलनेत वर्षभरात १३.४% वाढली होती.
आशियातील सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताचे स्थान
• २०२० मध्ये आशिया/ पॅसिफिक जपान आणि चीन वगळता (एपीईजेसी) च्या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारताचा वाटा १७.५% होता.
• सन २०२० मध्ये मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल आणि एसएपी सारख्या सॉफ्टवेअर कंपन्या भारतीय क्षेत्रामध्ये आघाडीवर होत्या.
• आयडीसीचा अंदाज आहे की, २०२० ते २०२५ पर्यंत भारताच्या एकूण सॉफ्टवेअर क्षेत्रात वार्षिक वाढीच्या दरात (सीएजीआर) ११.६ टक्के वाढ अपेक्षित आहे.
• भारतीय उद्योजक तंत्रज्ञानात गुंतवणूक करत राहतील, त्यामुळे कर्मचार्यांची कार्यक्षमता सुधारण्यास आणि नाविन्य आणण्यास मदत होईल ज्यामुळे व्यवसायाला गती मिळेल.
सॉफ्टवेअर आणि विक्री क्षेत्रात मनुष्यबळाची आवश्यकता वाढली
• कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक व्यवसायात आयटीचे महत्त्व वाढले आहे.
• लॉकडाऊननंतर विक्री सेवांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता वाढली आहे.
• अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे या १७ क्षेत्रातील २,६३,००० प्रोफाइल्सच्या विश्लेषणावर हा अंदाज अहवाल तयार करण्यात आला आहे.
• विक्री क्षेत्रात ९.८२% आणि आयटी क्षेत्रात ८.५५% वेतनवाढ झाली आहे, जी सामान्य वेतनवाढीपेक्षा जास्त आहे.
तंत्रज्ञानाच्या उद्योजकांनी भारताच्या चार दशकांच्या आयटी सेवा उद्योगाशी निगडित हजारो स्टार्टअप्स सुरू केले आहेत. हे स्टार्टअप उच्च श्रेणीचे सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रदान करीत आहेत. यामध्ये बिलिंगपासून ग्राहक सपोर्टपर्यंतच्या सेवांचा समावेश आहे. हे स्टार्टअप्स क्लाऊडद्वारे सदस्यता आधारावर सेवा प्रदान करतात.
सौजन्य: www.meity.gov.in/