मुक्तपीठ टीम
येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. कारण ओपेत प्लस देशांनी ५ देशांना कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यास मान्यता दिली आहे. इराक, कुवैत, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) आपले उत्पादन वाढवतील, असे जाहीर करण्यात आले आहे. भारतानेही वाढती इंधन महागाई लक्षात घेत कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याची मागणी तेल उत्पादक देशांकडे केली होती.
इंधनाचे भाव कसे भडकले?
• सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७५ डॉलरच्या जवळपास आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर १०० रुपयांच्या पुढे गेली आहे.
• ओपेक प्लस देशांनी ऑगस्टपासून तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
• यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमतीमध्ये घसरण होऊ शकते.
• कोरोना निर्बंध कमी होऊ लागल्यानंतर पेट्रोलियम पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ झाली.
• त्याचवेळी ओपेक देशांनी उत्पादन मर्यादित ठेवलं असल्यामुळे या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली.
• जुलै महिन्यात कच्च्या तेलाचा दर ७८ डॉलरपर्यंत पोहोचला.
कच्च्या तेलाचे उत्पादन का घटले? आता कसे वाढेल?
• ओपेक प्लस देशांनी गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दररोज १० दशलक्ष बॅरेल्स उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला.
• त्यात हळूहळू वाढही करण्यात आली.
• मात्र अद्याप ५.८ मिलियन बॅरलची कपात आहे.
• ओपेक प्लस देश एकत्रितपणे दरमहा दररोज ४ लाख बॅरल उत्पादन वाढवतील, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
• याची सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल.
इंधन महागाचं स्वस्त कसं होईल?
• गेल्या एका वर्षात कच्चे तेल ४३ पासून ७३ डॉलरवर पोहोचले-
• १९ जुलै २०२० रोजी बेबी ऑईलची किंमत प्रति बॅरल ४३ डॉलर इतकी होती पण उत्पादन कमी होत असल्याने आणि मागणीमुळे त्याची किंमत वाढतच गेली.
• हे सध्या सुमारे ७३ डॉलर्स चालू आहे.
• आता युएई आणि सौदी अरेबियामधील करारानंतरच उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• सप्टेंबरमध्ये आताच्या तुलनेत दर दिवशी उत्पादन ८ लाख बॅरलने वाढेल.
• या गणितानुसार ऑक्टोबरमध्ये दररोज १२ लाख बॅरल, नोव्हेंबरमध्ये दररोज १६ लाख बॅरल तर डिसेंबरमध्ये दररोज २० लाख बॅरल उत्पादन असेल.
• उत्पादन वाढू लागले की बाजाराच्या नियमानुसार किंमत खाली जाईल. कच्च तेल स्वस्त झाले की ग्राहकालाही स्वस्त मिळेल.