Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फोनवर बोलताय…फोनवर काहीही करताय…सावधान! ’पेगॅसस’ आहे तिथं!!

पेगॅसस सॉफ्टवेअरने भारतासह अनेक देशांमध्ये पत्रकार, कार्यकर्त्यांची हेरगिरी

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
pegasus software

मुक्तपीठ टीम

इस्त्रायली कंपनीने बनविलेले ‘पेगॅसस’ स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जगभरातील सरकार या स्पायवेअरचा वापर करतात, असा आरोप आहे. या मदतीमुळे बर्‍याच लोकांचे फोन हॅक झाल्याची बातमी अनेकदा समोर आली आहे. या स्पायवेअरला बळी पडलेल्यांमध्ये अनेक पत्रकार आणि कार्यकर्तेही जगभरातील १७ माध्यम संस्थांनी एकत्र येऊन शोध मोहिमेमधून उघड झालेली माहिती धक्कादायक आहे. त्यानुसार, जगभरातील सरकार पत्रकारांची आणि कार्यकर्त्यांची हेरगिरी करत आहेत. भारतासह अनेक देशांमधील सत्ताधाऱ्यांनी सुमारे १८० पत्रकारांची, मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केली आहे. या अहवालात किमान ३८ जणांनी हेरगिरी केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या ‘पेगॅसस’ या स्पायवेअर सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न:

 

‘पेगॅसस’विषयी सर्व काही

• ‘पेगॅसस’ हे एक इस्त्रायली सॉफ्टवेअर आहे.
• एनएसओ या इस्त्रायली कंपनीनं हे स्पायवेअर तयार केले आहे.
• एनएसओच्या दाव्यानुसार ते फक्त सरकार किंवा सरकारी यंत्रणांनाच वापर करण्यासाठी कंपनी विकते.
• याचाच अर्थ सामान्य नागरिक किंवा खासगी संस्था ठरवूनही त्याचा गैरवापर करू शकत नाहीत, याउलट अशी कोणतीही ‘पेगॅसस’ फोन हेरगिरी झाली तर ती सरकारनेच केली, हे स्पष्ट आहे.

 

पेगॅसस सॉफ्टवेअर कसे कार्य करते?

• पेगॅससद्वारे एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, आयमेसेज (आयफोनवर) किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे हेरगिरी करायची असलेल्या व्यक्तीच्या फोनवर एक लिंक पाठविली जाते.
• ही लिंक एका अशा संदेशासह पाठविला जाते की त्यावर लक्ष्य व्यक्ती एकदा क्लिक करते.
• स्पायवेअर फक्त एका क्लिकवर फोनमध्ये सक्रिय होते.
• एकदा का ‘पेगॅसस’ फोनमध्ये इन्स्टॉल केलं तर हॅकर्स तुमच्या फोनचा ताबा घेतात. ते फेन वापरू शकतात. फोन भले तुमच्या हातात असेल, पण त्यावर हॅकर्सचं नियंत्रण असू शकतं.
• त्यातून ‘पेगॅसस’माध्यमातून हॅकर हवी ती माहिती मिळवू
शकतात.
• त्यात तुमचा पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज सगळं
ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात. एवढच नाही तर तुमच्या फोनचा कॅमेरा, माईक यालाही हॅकर्स त्यांना वाटेल तेव्हा चालू करु शकतात. तुमचं रियल टाईम लोकेशन त्यांना सहज मिळू शकतं.
• फोनच्याच माध्यमातून मग हॅकर्स तुमचे ई मेल, SMS,नेटवर्क डिटेल्स, तुमच्या फोनची सेटींग, तुमच्या फोनची ब्राऊझिंग हिस्ट्री अशी सगळी माहिती मिळवू शकतात.
• एकदा ‘पेगॅसस’ सक्रिय झाल्यानंतर ते फोनच्या एसएमएस, ईमेल, व्हॉट्सअॅप चॅट, कॉन्टॅक्ट बुक, जीपीएस डेटा, फोटो आणि व्हिडीओ लायब्ररी, कॅलेंडर इत्यादी हॅक करतं.
• म्हणजेच एकदा का तुमच्या फोनमध्ये पेगासस इन्स्टॉल झाला तर तुमची सगळी माहिती हॅकर्सना सहज उपलब्ध होते.

 

‘पेगॅसस’ गोपनीयतेसाठी धोकादायक का आहे?

• ‘पेगॅसस’ बनवताना कमालीचं कौशल्य वापरलं गेलं आहे. कमालीची काळजी घेतली गेली आहे. त्यामुळे ते हेरगिरीसाठीचं सर्वोत्तम स्पायवेअऱ मानलं जातं.
• पेगॅसस’ हे एकदा इन्स्टॉल झालं तर फोनमध्ये त्याला शोधणं अतिशय अवघड असतं, कारण हे स्पायवेअर कसलाही माग सोडत नाही. त्यामुळे ते असण्याचा पुरावा मिळत नाही.
• खरंतर महागडा आयफोन हा सुरक्षित असल्याच्या दाव्यामुळेच त्याला पसंती दिली जाते, पण ‘पेगॅसस’ आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टमलाही हॅक करु
शकते.
• फोन जरी लॉक केला असला तरीही ‘पेगॅसस’ सक्रिय राहते.
• पेगॅसस’ हे कमी बँडविथवर काम करु शकते. त्यासाठी फोनची बॅटरीही फार खात नाही, मेमरी, डेटा यालाही तो फार संपवत नाही, त्यामुळे स्पायवेअर आहे असा संशय येत नाही.
• फोन नकळत हॅक झाला असल्याचे लक्षात येत नाही.

 

भारतासाठी यात महत्वाचा भाग म्हणजे २०१७ ते २०१९ दरम्यान भारतात किमान ३०० नागरिकांचे फोन हॅक करण्यात आले होते. त्यात किमान ३० पत्रकार होते. भारतातील मोदी सरकारनेच हे स्पायवेअर वापरून विरोधी विचारांच्या लोकांवर हेरगिरी केल्याचा आरोप होत आहे. मात्र, सरकारने इंकार केला आहे.

 

केंद्र सरकारची काय प्रतिक्रिया?

• विशिष्ट लोकांवर पाळत ठेवण्याच्या आरोपांचा सरकारने इंकार केला आहे.
• सरकारने म्हटले की, ‘यासंदर्भात कोणतेही ठोस आधार किंवा हे सत्य नाही.’
• सरकारच्या वतीने निवेदन जारी केले गेले, त्यात दावा करण्यात आला की, “भारत हा एक लोकशाही देश आहे आणि आपल्या सर्व नागरिकांचा मूलभूत हक्क म्हणून गोपनीयतेचा हक्क सुनिश्चित करण्यास सरकार वचनबद्ध आहे.”


Tags: ‘पेगॅससpegasus spywarephone hackingइस्त्रायली कंपनीकेंद्र सरकार
Previous Post

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी घरपोच लसीकरणाची सुविधा

Next Post

काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता!

Next Post
Petrol -Diesel

काही दिवसांत पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!