मुक्तपीठ टीम
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नूने संस्कृतमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाने जुलैच्या सत्रापासून ओपन अँड डिस्टन्स मोडमध्ये कम्युनिकेटिव्ह संस्कृत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवार अॅडमिशन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमचा किमान कालावधी सहा महिने निश्चित करण्यात आला आहे आणि कमाल कालावधी एक वर्षाचा आहे. १५ जुलै ही या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे.
संस्कृत कोर्स कसा असणार?
- १५ जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख
- विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये सुधारणे आणि त्यांना संकृतमध्ये संवाद साधण्यास सक्षम करणे हा या कोर्सचा उद्देश आहे.
- या कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै आहे.
- अर्ज करणारे उमेदवार १२ वी पास किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- अभ्यासक्रमासाठी उमेदवारांना 1१५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
- त्याचबरोबर अर्ज फी २०० रुपये भरावी लागणार आहे.
— IGNOU (@OfficialIGNOU) July 8, 2021
इग्नूचे अनेक कोर्स
- यापूर्वी अनेक अभ्यासक्रमाची सुरुवात-
- इग्नूतर्फे नुकतेच नवे कार्यक्रम आणि अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
- मास्टर ऑफ आर्ट्स ज्योतिष आणि मास्टर ऑफ आर्ट्स प्रोग्राम सुरु करण्यात आले आहेत.
- त्यातील मास्टर ऑफ ज्योतिष अभ्यासक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
- हे कार्यक्रम दोन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहेत.
उर्दूसाठी मास्टर्स कोर्स
- याशिवाय इग्नूच्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीजनेही दूरस्थ शिक्षण अंतर्गत उर्दूमध्ये मास्टर्स प्रोग्राम सुरू केला आहे.
- हा कोर्स उर्दू साहित्य आणि भाषेचे सर्वसमावेशक शिक्षण प्रदान करेल.