मुक्तपीठ टीम
स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश होणार आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित हा आगामी चित्रपट बनवणार आहेत. अशोक पंडित यांचा आगामी चित्रपट भारताची माजी सुवर्णपदक विजेती महिला अॅथलीट पिंकी प्रामणिकची बायोपिक असेल. अशोक यांनी या बायोपिक चित्रपटाची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केली आहे.
अशोक पंडित यांचा आगामी चित्रपट
अशोक पंडित यांनी ट्विटरवरून चित्रपटाची घोषणा केली आहे. ते म्हणालेत, “अशोक पंडित प्रॉडक्शनसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. हा चित्रपट सर्व अॅथलिटना सलाम करणारा ठरेल. यासोबतच त्यांनी फोटोंचा एक कोलाजही शेअर केला आहे, ज्यात अशोकसह बायोपिकची लेखक आणि पिंकी दिसत आहे. शेअर केलेल्या कोलाजमध्ये लिहिले आहे की, ‘आतापर्यंतची सर्वात वादग्रस्त महिला अॅथलिटची कहाणी आहे जिला पुरूष ठरविण्यात आले. तिच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.’ पंडित यांनी जे ट्वीट केले तोच असामान्य असा संघर्ष पिंकी प्रामाणिकनं केला आहे. त्यातून की निर्दोष बाहेर आली. त्यामुळे तो संघर्ष असंख्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
चित्रपटाचे शीर्षक आणि कलाकारांची निवड बाकी
चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते लवकरच चित्रपटाच्या मुख्य कलाकारांची घोषणा करणार आहेत. या बायोपिक चित्रपटाची कथा प्रियंका घटक यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर पिंकीची बायोपिकची बातमी ट्विटरवर ट्रेंड होत आहे. याबद्दल अशोकने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
कोण आहे पिंकी प्रामणिक?
- पिंकीने आंतरराष्ट्रीय चँपियनशिपमध्ये भारतासाठी अनेक सुवर्ण आणि रौप्यपदके जिंकली आहेत.
- मात्र, खेळाच्या मैदानाबाहेर पिंकीचे वैयक्तिक आयुष्य बर्याच वादात सापडले आहे.
- २०१२ मध्ये पिंकीच्या मित्राने तिच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
- पिंकीला पुरूष ठरविण्यात आले आहे.
- पिंकीला २५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.
- २०१४ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.