Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अ‍ॅथलीट पिंकी प्रामाणिकच्या संघर्षावर बायोपिक चित्रपट

July 8, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
pinky pramanik

मुक्तपीठ टीम

स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश होणार आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित हा आगामी चित्रपट बनवणार आहेत. अशोक पंडित यांचा आगामी चित्रपट भारताची माजी सुवर्णपदक विजेती महिला अ‍ॅथलीट पिंकी प्रामणिकची बायोपिक असेल. अशोक यांनी या बायोपिक चित्रपटाची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केली आहे.

 

अशोक पंडित यांचा आगामी चित्रपट

अशोक पंडित यांनी ट्विटरवरून चित्रपटाची घोषणा केली आहे. ते म्हणालेत, “अशोक पंडित प्रॉडक्शनसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. हा चित्रपट सर्व अ‍ॅथलिटना सलाम करणारा ठरेल. यासोबतच त्यांनी फोटोंचा एक कोलाजही शेअर केला आहे, ज्यात अशोकसह बायोपिकची लेखक आणि पिंकी दिसत आहे. शेअर केलेल्या कोलाजमध्ये लिहिले आहे की, ‘आतापर्यंतची सर्वात वादग्रस्त महिला अ‍ॅथलिटची कहाणी आहे जिला पुरूष ठरविण्यात आले. तिच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.’ पंडित यांनी जे ट्वीट केले तोच असामान्य असा संघर्ष पिंकी प्रामाणिकनं केला आहे. त्यातून की निर्दोष बाहेर आली. त्यामुळे तो संघर्ष असंख्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Ashok pandit

चित्रपटाचे शीर्षक आणि कलाकारांची निवड बाकी

चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते लवकरच चित्रपटाच्या मुख्य कलाकारांची घोषणा करणार आहेत. या बायोपिक चित्रपटाची कथा प्रियंका घटक यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर पिंकीची बायोपिकची बातमी ट्विटरवर ट्रेंड होत आहे. याबद्दल अशोकने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 

कोण आहे पिंकी प्रामणिक?

  • पिंकीने आंतरराष्ट्रीय चँपियनशिपमध्ये भारतासाठी अनेक सुवर्ण आणि रौप्यपदके जिंकली आहेत.
  • मात्र, खेळाच्या मैदानाबाहेर पिंकीचे वैयक्तिक आयुष्य बर्‍याच वादात सापडले आहे.
  • २०१२ मध्ये पिंकीच्या मित्राने तिच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
  • पिंकीला पुरूष ठरविण्यात आले आहे.
  • पिंकीला २५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.
  • २०१४ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने सर्व आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

पाहा व्हिडीओ:


Tags: Ashok panditpinki pramanikअशोक पंडितकोलकाता उच्च न्यायालयपिंकी प्रामणिकप्रियंका घटकबायोपिकसुवर्ण आणि रौप्यपदक
Previous Post

तळहातात मावेल एवढा स्मार्ट फोन! जगातील सर्वात लहान!!

Next Post

महाराष्ट्रात जूनमध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार

Next Post
job

महाराष्ट्रात जूनमध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!