मुक्तपीठ टीम
शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते राज्यातील ६ राष्ट्रीय आय.सी.टी पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सदरचे राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार हे राष्ट्रीय स्तरावरून सन २०१८ व २०१९ या वर्षासाठी जाहीर करण्यात आले. सन २०१८ या वर्षासाठी नागनाथ विभूते, आनंदा अनेमवाड, उमेश खोसे यांना जाहीर झाला तर सन २०१९ या वर्षासाठी मृणाल गांजळे, प्रकाश चव्हाण व शफी शेख यांना जाहीर झाला आहे. यासाठी राज्यस्तरावरून एकूण १२ शिक्षकांची नामनिर्देशने राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेले होते. नामनिर्देशित शिक्षकांमधून एकूण ६ शिक्षकांची वर्षनिहाय निवड करण्यात आली.
पुरस्कार विजेत्या शिक्षकांमधील आनंदा बालाजी आनेमवाड, जि.प. शाळा मल्याण मराठी , ता – डहाणू, जि- पालघर मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवले व शिक्षण आनंददायी केले. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन 3D अॅनिमेटेड व्हिडिओ निर्मिती केली आहे.
उमेश रघुनाथ खोसे, जि. प.प्रा.शाळा जगदंबानगर कडदोर, ता.उमरगा जि. उस्मानाबाद यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेता यावे यासाठी ऑफलाईन ५१ अॅप्सची निर्मिती केली. स्वतः शाळेची वेबसाईट तयार करून कोरोना काळात सलग दोन वर्षे ऑनलाईन निकाल लावला. स्वतः च्या वेबसाईटवरून लाखो विद्यार्थी व शिक्षकांना लाभ दिला गेला. बंजारा तांड्यावरील शाळेत शाळा ४ थी वरून ७ वी पर्यंत, ४० पटसंख्येवरून १०४, शिक्षक २ वरून ५ झालेशिष्यवृत्तीधारक मध्ये ३७ विद्यार्थी यशस्वी, सैनिक स्कुलला विद्यार्थ्यांची निवड झाली.
नागनाथ विभूते, जि.प. शाळा जांभूळदरा, ता. खेड, जिल्हा पुणे यांचे मार्फत लर्निंग विथ अॅलेक्सा चा उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थी शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व त्यामुळे विद्यार्थी गुणवत्ते मध्ये झालेली वाढ दिसून येत आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी अभ्यासक्रमावर आधारित विवध अॅप्सची ची निर्मिती केली. ऑस्ट्रेलिया देशातील मराठी शाळांशी संवाद घडवत Learning beyond the classroom साकारले आहे.
मृणाल गांजळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे तालुका. आंबेगाव जिल्हा पुणे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना तंत्रज्ञानाप्रति आवड निर्माण करून, त्याचा अध्यापनात वापर केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळे नावीन्यपूर्ण व सकारात्मक प्रयोग केले. यामध्ये online शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद ,वेबसाइट मोबाईल अॅप्लीकेशनचा वापर, राज्यातील शिक्षक इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शाळेतील विद्यार्थी online अत्याधुनिक शिक्षण घेत आहेत. सन २०१९ -२०२० या वर्षात इयत्ता ५ वी मध्ये शिष्यवृत्ती धारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवड पात्र आहेत. प्रकाश लोटन चव्हाण, जि.प.शाळा करंजवन, ता.दिंडोरी, जिल्हा. नाशिक यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण देण्यामध्ये महत्वाचा व सक्रीय सहभाग घेतला आहे. विविध ई-निर्मिती कार्यशाळांमध्ये आपला सहभाग नोंदवून दर्जेदार ई- साहित्य निर्मिती केलेली आहे. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विविध ऑनलाइन साधनांचा व प्रसंगी विद्यार्थी गृहभेटी देऊन विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवले आहे.
शफी अजीस शेख, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिटरगाव,ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या शाळेतील विद्यार्थी आज इतर देशातील तब्बल ३० हून जास्त देशातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती ची माहिती देत आहेत, गुगल अर्थ च्या माध्यमातून विविध भौगोलिक, सामाजिक स्थळांना आम्ही भेटी दिल्या, गुगल क्लासरूम, टिम्स च्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन क्लास घेत आहोत, my cloth बॅग, सीड बँक, सारखे पर्यावरण स्नेही उपक्रम यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने राबविले, AR (Augmented Reality ) VR (virtual Reality) या सारख्या तंत्रज्ञानाचा वापर कठीण संकल्पना स्पष्ट करण्यासाठी केला.
या प्रसंगी वर्षा गायकवाड यांनी सर्व विजेत्या शिक्षकांचे व राज्याच्या आय.टी. विभागाचे कौतुक केले. सदर प्रसंगी वर्षा गायकवाड यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या तंत्रज्ञान च्या क्षेत्रामधील कामाचा आढावा घेऊन अशा प्रकारचे काम आपल्या जिल्ह्याबरोबरच राज्यातील इतर शाळांसाठी याचा फायदा होईल या दृष्टीने कामकाज करणेबाबत सूचित केले. तसेच राज्यामधील शैक्षणिक तंत्रज्ञानामधील कामकाज अजून दर्जेदारपणे व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणेबाबत सूचित केले.
याप्रसंगी विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे हे उपस्थित होते.