मुक्तपीठ टीम
सीमेवर कारवाईसाठी स्वदेशी पूल तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. त्यामुळे आता सैन्याला मोठा दिलासा मिळणार आहे. आज भारतीय सेनेला स्वदेशी विकसीत पुल म्हणजेच १२ शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम प्राप्त झाल्या आहेत. या शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टममुळे लष्कराला छोट्या नद्या आणि यासारख्या इतर ठिकाणी वेगवान हालचाली करण्यात अडथळे येणार नाहीत.
#IndianArmy inducts the indigenously developed 10 metres Short Span Bridge. Watch the newly inducted combat bridging system in action.#IndianArmy#StrongAndCapable pic.twitter.com/5OWqE6Vkat
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 2, 2021
शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टमविषयी सर्व काही!
• हे पूल यांत्रिकी पद्धतीचे आहेत.
• भारत इलेक्टॉनिक्स, डीआरडीओने डिझाइन केलेल्या या शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टमची निर्मिती लार्सन अँड ट्युब्रो करीत आहे.
• पाण्याच्या विविध अडथळ्यांमधून ७० टन रणगाडेही वाहून नेण्यास सक्षम आहेत.
• या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यमान ब्रिजिंग सिस्टमशी ते जुळणारे आहेत.
• त्यांच्यामुळे पश्चिम सीमेवरील सर्व प्रकारच्या वाहत्या पाण्याचे अडथळे आता अडवणार नाहीत.
• भविष्यात पश्चिमेकडील शत्रूशी झालेल्या संघर्षात
हे ब्रिज उपयोगी ठरतील.
• शत्रूंच्या कोणत्याही हालचालींना वेळीच वेगवान योग्य वेळीच प्रत्युत्तर दिले जाऊ शकेल.
Gen MM Naravane, #COAS inducted the indigenously developed 10 metres Short Span Bridging System into Corps of Engineers at Delhi Cantt. The equipment provides enhanced mobility during mechanised operations.#IndianArmy#StrongAndCapable pic.twitter.com/cYbKnedDAP
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 2, 2021
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याद्वारे दिल्ली कॅन्ट येथील कोर ऑफ इंजिनीअर्सला सोपवण्यात आले आहेत. याची किंमत ४९२ कोटींपेक्षा जास्त आहे. डीआरडीओसह भारतीय लष्कराच्या इंजिनीअर्सद्वारे या यंत्रणेची आखणी करण्यात आली आहे. तर लार्सन अॅन्ड टुब्रो लिमिटेड यांनी देशभरात या यंत्रणेची निर्मिती केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षात उद्योगांवर कोरोना निर्बंध घातले गेले असले तरी भारतीय लष्कराला ब्रिजिंग सिस्टमचा पुरवठा वेळेवर केला होत आहे.