मुक्तपीठ टीम
ऑक्टोबर २०२० मध्ये लॅाकडाऊनच्या मर्यादेतून बाहेर पडत खारघरच्या डोंगरावर ट्रेकिंगला जाण्यासाठी निघालेल्या जॉगर्सना तिथे सुंदर फुले, फुलपाखरे आणि धबधब्यांच्या दृश्यांऐवजी वापरलेले कप, आवरणे, बिअरच्या बाटल्या आणि चटई, गाद्या असा कचरा पाहण्यास मिळाला.
हे दृश्य पाहून स्वाभाविकच तिथे जाणारे अनेकजण दु:खी झाले. मात्र, २३ वर्षांच्या रश्मी सिंह या तरुणीचा अपवाद होता. तिने शोध घेतला तिला प्लॉगर हा नवा शब्द सापडला. ‘जॉगिंग’ आणि ‘प्लॉक अप’ या स्वीडिश या शब्दाचा प्लॅागिंग. हा एकप्रकारे ‘पिकअप’ साठी पर्यायी शब्द आहे. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वच्छतेची निकड ओळखून मुंबई प्लॅागर्स हा नवीन समुदाय स्थापन केला. आता हे प्लॉगर्स शहरातील स्वच्छता मोहिमेतील नवीन हीरो म्हणून ओळखले जात आहेत.
सिंह आता मुंबई पॅागर्स समुदायाच्या प्रमुख आहेत. त्यांना डोंगराच्या शिखरावर बाटल्या, पॅकेट्स आणि इतर कचरा पाहिल्यामुळे राग आला. पण त्यातून निराश होण्याऐवजी त्यांनी कृतीची प्रेरणा घेतली. त्यांनी सोशल मीडिया पेजवर स्टोरी पोस्ट केल्या. मित्र, कुटुंब आणि ओळखीचे लोक यांना त्यात सामील केले. हळू हळू अन्य ट्रेकर्सही यामध्ये सामील होऊ लागले. आम्ही इतर शहरांतील प्लॅागर्सचेही लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सहकार्याने ३० समर्पित प्लॅागर्सचा समुदाय तयार झाला. दर रविवारी कचरा वेचण्यासाठी दोन तास घालवतात आणि जनजागरणासाठी आणखी दोन तास घालवतात.
प्लॅागिंगमुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. जॉगिंग करताना स्टूपिंग, स्क्वॉटिंग, ट्विस्टिंग आणि विस्तृत स्नायूंच्या हालचाली होतात. अर्धा तास धावण्यामुळे २३५ कॅलरी जळतात. जर आपण कचर्याच्या प्रचंड पिशव्या उचलत असाल आणि उतारावर चढल्याने वेट लिफ्टींगसारखाही फायदा होऊ शकेल.
पाहा व्हिडीओ: