मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळलेला होता. कोरोना काळात नवनवीन विषाणूचे प्रकार समोर येत आहेत. नव्या आढळलेल्या या सायटोमॅजिलो विषाणूमुळे आता काय काळजी घेणं आवश्यक आहे, हा विषाणू किती धोकादायक आहे, याची माहिती असणं आवश्यक आहे.
काय आहे सायटोमॅजिलो विषाणू?
- सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे.
- अमेरिकेत वयाची चाळीशी ओलांडलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात सायटोमॅजिलो विषाणू आढळतो.
- हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांकडे लाळ किंवा थुंकीद्वारे संक्रमण पसरवतो.
- या विषाणूमुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात.
- रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांसाठी धोकादायक
- ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात.
- ज्यांच्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी असते त्यांच्यासाठी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.
काय आहेत सायटोमॅजिलो विषाणूची लक्षणं?
- व्यक्तिमत्वात बदल जाणवू लागतात.
- डोकेदुखी, श्वास घेताना अडचण येते.
- ताप येणं.
- या विषाणूची बाधा झालेली आहे की नाही हे रक्त चाचणीतून तपासलं जातं.
- हा विषाणू लहान मुलं, गर्भवती महिलांमध्येही आढळतो.