Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चक्रीवादळ कोकणाकडून गुजरातच्या दिशेने, आणखी दोन दिवस सावधानतेचा इशारा

May 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
cyclone

मुक्तपीठ टीम

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना सध्या कोरोनासोबतच ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रात पोहचलेले या चक्रीवादळाचा मोठा फटका राज्याला बसण्याची शक्यता कमी असली तरी कमालीची दक्षता घेतली जात आहे. दर तासाला अधिक जोर पकडणारे हे चक्रीवादळ सध्या कोकण किनारपट्टीकडून गुजरातच्या दिशेने सरकत आहे. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातही रायगड, मुंबई, पालघर जिल्ह्यात विशेष सतर्कता घेतली गेली आहे.

चक्रीवादळाचा महाराष्ट्रात

  • सकाळी ८ च्या सुमारास महाराष्ट्रात प्रवेश केला.
  • सिंधुदुर्गात पाऊस पडला
  • दुपारी रत्नागिरी जिल्ह्यात आंबोळगडमध्ये चक्रीवादळ दाखल होणार आहे.
  • मुंबईपासून ४५० किलोमीटर अंतरावर वादळ

कसा असेल चक्रीवादळाचा प्रवास-

  • १४ मे लक्षद्वीप बेटांजवळ निर्माण होण्यास सुरुवात झाली, केरळ राज्यात मोठा पाऊस
  • १५ मे गोवा किनारपट्टी प्रवास सुरु
  • १६ मे चक्रीवादळात रुपांतर, कोकण किनारपट्टीवर प्रवेश
  • १७ मे मुंबईजवळून गुजरातच्या दिशेने जाणार
  • १८ मे राजकोटला पोहोचणार
  • १९ मे राजस्थानमधून कराचीमार्गे पाकिस्तानकडे जाणार

सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद-

  • सिंधुदुर्गात रात्री २ पासून वादळी वारे वाहू लागले आहे.
  • रात्री २ पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गेली
  • तर किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस

कोल्हापूरात शेतीचे नुकसान, घरांची पडझड-

  • तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यालाही बसला आहे.
  • शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
  • वादळी वाऱ्यांमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात काही घरांची पडझड झाली आहे.

 

रत्नागिरीत तालुक्यातील १०४ गावांना सतर्कतेचा इशारा-

  • आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी करण्यात आली आहे.
  • तर आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी केली आहे.
  • किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा
  • रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांना सतर्कतेचा इशारा
  • शनिवारी मध्यरात्री रिमझिम पाऊस

 

रायगडच्या रुग्णालयात विशेष खबरदारी

  • जिल्हातील सर्व कोरोना रुग्णालयात किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यात आला आहे.
  • प्रत्येक रुग्णालयात किमान दोन जनरेटर तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • या रुग्णालयांमध्ये महावितरणची यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
  • कोरोना उपचार घेणाऱ्या आणि ऑक्सिजनची गरज असणाऱ्या ग्रामीण रुग्णांना अलिबाग, माणगाव, पेण, पनवेल येथील रुग्णालयात हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

मुंबईत रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

  • मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोरोना रुग्णालयातून रुग्णांना हलवले
  • तसेच दहिसर आणि मुलुंडच्या कोरोना रुग्णालयातून ही रुग्णांना सुरक्षित हलविण्यात आलं.
  • मुंबईत अनेक भागात सोसाट्याचा वारा-
  • मुंबईतील शहर व उपनगरात रिमझिम पाऊस
  • मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी वाहतुकाला बंद करण्यात आला आहे.

 

नाशिक जिल्ह्यात अफवांचं थैमान, विश्वास न ठेवण्याचं आवाहन

  • नाशिक जिल्ह्यात अनेक भागात रात्री पासून ढगाळ वातावरण
  • चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नाशिक जिल्हा आपत्कालीन विभाग सतर्क
  • जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
  • नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

Tags: cycloneCyclone tauktaekokanकोरोनाचक्रीवादळतौक्ते चक्रीवादळ
Previous Post

प्रतिभाशाली उमदे नेतृत्व हरपले!

Next Post

सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू असतो तरी कसा?

Next Post
Rajeev Satav cytomegalovirus

सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो विषाणू असतो तरी कसा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!