मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात सेलर (एए) या पदासाठी ५०० जागा, सेलर (एसएसआर) या पदासाठी २००० जागा अशा एकूण २५०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ६०% गुणांसह १२वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
२) पद क्र.२- १२वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ दरम्यानचे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: