Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑनलाइन लबाडी! मुंबईतही रेमडेसिविरऐवजी गोळ्यांची भुकटी!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
remdesivir

मुक्तपीठ टीम

लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेत खिसे भरणाऱ्या गिधाडांनी कोरोना संकटांचा गैरफायदा घेण्यासाठी घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कितीही गरज असली तरीही रेमडेसिविर खरेदी करता कमालीची काळजी घ्या. ऑनलाइन जाहिराती करून गरजूंची जीवघेणी फसवणूक करणारे अनेक भामटे सक्रिय झाले आहेत. मुंबईत अशाच एका घटनेत एका महिलेला रेमडेसिविरच्या नावाखाली पॅरासिटामॉल आणि क्रोसिनची भुकटी विकण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि अपुऱ्या आरोग्य सुविधेच्या तुटवड्यांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र काळाबाजाराचे प्रमाण वाढले असतानाच आता फसवणूकही सुरु झाली आहे. राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असताना एका महिलेची रेमडेसिविर ऐवजी गोळ्यांची भुकटी देऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरमध्ये घडली आहे.

कशी झाली ऑनलाइन फसवणूक?

  • घाटकोपरमध्ये एका खासगी रुग्णालयात या महिलेच्या नातेवाईकाला सहा रेमडेसिविर इजेक्शनची गरज होती.
  • इजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णालयाने महिलेला इजेक्शन आणण्यास सांगितले.
  • महिलेने सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती.
  • जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधत तिने या सहा कुप्यांची मागणी केली.
  • या सहा कुप्यांसाठी तिने ऑनलाइन १८ हजार रुपये ट्रान्सफर केले होते. त्यानंतर महिलेच्या घरी पार्सल आले.
  • तिने ते उघडले असता तिला धक्काच बसला, कारण त्यात रेमडेसिविर इंजेक्शनऐवजी पाच कुप्या होत्या आणि प्रत्येक कुपीत रेमडेसिविर नसून औषधी गोळ्यांची भुकटी होती.
  • तपासणी केली असता तिची फसवणूक झाल्याचे उघड झाले. तिला पॅरासिटामॉल, क्रोसिन या औषधी गोळ्यांची भुकटी टाकण्यात आलेल्या कुप्या पाठविण्यात आल्या होत्या.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने त्वरित टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहेत.


Tags: mumbairemdesivir injectionऔषधी गोळ्यांची भुकटीमुंबईरेमडेसिविर इंजेक्शन
Previous Post

नौदलात बारावी उत्तीर्णांसाठी २५०० जागांवर करिअर संधी

Next Post

‘सामना’ वाचून आज भुजबळ खूश होतील! “मोदींनी जे आता सांगितले ते भुजबळांनी आधीच सांगितले!”

Next Post
saamana

‘सामना’ वाचून आज भुजबळ खूश होतील! “मोदींनी जे आता सांगितले ते भुजबळांनी आधीच सांगितले!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!