मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण असताना भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के म्हणजेच समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानी वर्तवला आहे. हे प्रमाण हवामान खाते किंवा इतर खासगी संस्था ठरवतात तरी कसे?
मिनिस्ट्री ऑफ अर्थ साइंसेसचे सचिव एम. राजीवन यांनी यासंबंधीत म्हटले की, गेले दोन वर्ष सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर, यावर्षी मात्र संपूर्ण देशात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरी ९८ टक्के पाऊस म्हणजे समाधानकारक पाऊस मानले जाते.
सलग तीन वर्ष पडला चांगला पाऊस
- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,वर्ष २०२१च्या आधी २०२० मध्ये पावसाची सरासरी ११० टक्के तर २०१९मध्ये १०९ टक्के होती.
- तर सन १९९१ १९९६, आणि १९९८ या सलग तीन वर्षी मान्सून सामान्य होता.
पावसाचे प्रमाण कसे ठरवले जाते?
- हवामान विभागाने पावसाचे प्रमाण हे ‘सामान्य, कमी आणि जास्त’ हे ठरविण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत.
- ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल तर तो सामान्य पाऊस मानले जाते.
- ९० ते ९६ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल तर सामान्यपेक्षा कमी पाऊस मानले जाते.
- १०४ ते ११० टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल तर तो सामान्यहून अधिक पाऊस
- ११० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास अतिवृष्टी मानली जाते.
- तसेच दीर्घ कालावधीसाठी दोन टप्प्यांमध्ये सरासरीचा अंदाज वर्तवला जातो.
- एप्रिलमध्ये एक आणि मेच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो.