मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत असतानाच आता महागाईचा वणवाही भडकू लागला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५२ टक्के असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे. व्यापाऱ्यांप्रमाणेच नोकरदारांचेही नुकसान होत आहेत. अनेक रोजगार, नोकरी गमावत आहेत. त्यातच महागाईही आता वाढू लागल्याने नवी धग सहन करावी लागणार आहे.
सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये अन्नधान्याच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई वाढली आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे किरकोळ महागाईचा दर आधीच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये ५.०३ टक्के होता.
महागाई दर वर-खाली
- जून ते नोव्हेंबर २०२० दरम्यान सलग ६ महिने सहा टक्क्यांची वरची मर्यादा सोडून डिसेंबर २०२०मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई दर खाली आला.
- जानेवारी २०२१मध्ये भाजीपाल्याच्या किंमतीत घसरण आणि धान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे ४.१ टक्क्यांपर्यंत महागाई दर खाली आला.
- मात्र, महागाई दर फेब्रुवारी २०२१मध्ये ५ टक्क्यांपर्यंत वाढला.
- मार्चमध्ये तो आणखी वाढून ५.५२ टक्क्यांवर गेला आहे.