मुक्तपीठ टीम
लग्नसोहळा म्हटलं तर एकीकडे आनंद असतोच मात्र दुसरीकडे लग्नाचा खर्चही असतो. बहुतेकजणांना आपलं लग्न हे शाही पद्धतीने आणि धुमधडाक्यात करायचे असते. मात्र आता शाही लग्न सोहळ्यांचा खर्च आयकर आपल्याला दाखवायला लागणार आहे. जर तसे झालं नाही तर ७७ टक्के दंडाच्या स्वरुपात कर भरावा लागणार आहे.
आयकर नियमांमध्ये बरेचसे बदल करण्यात आले आहेत, या नियमांबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आयकर नियमांनुसार उत्पन्नाचे स्त्रोत माहित असले पाहिजेत आणि जर तसे नसेल तर आपण मोठ्या अडचणीत येऊ शकतो. आता शाही लग्नाचा खर्च तुमच्या रिटर्न फाइलमध्ये दाखवावा लागणार आहे.
जर तुम्ही बोगस रिटर्न फाईल बनवली तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. येथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की जर तुम्ही नियमित करदाता असाल तर तुम्हाला उत्पन्नाचे योग्य स्त्रोत माहित असले पाहिजेत. उदाहरणार्थ, समजा तुम्ही लग्नात ५० लाख खर्च केले आहेत आणि तुम्हाला आयकर विभागाकडून ५० लाख रुपयांचा हिशोब मागण्याची नोटीस मिळाली आहे. आपण स्त्रोताबद्दल योग्य माहिती देखील देऊ शकत नाही आणि हा खर्च परताव्यामध्ये देखील नमूद केलेला नाही. यावर तुम्हाला ३७ लाखांपेक्षा जास्त कर जमा करावा लागेल.
आयकरच्या कलम ११ मध्ये उल्लेख
- कर तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर कलम ११५मध्ये असे नमूद केले आहे की तुम्हाला आयकर फाइल आणि दाखवलेल्या उत्पन्नाची माहिती असणे आवश्यक आहे.
- लग्नात खर्च केल्यानंतरही, जर ती रिटर्न फाइलमध्ये दर्शविली नाही, तर आयकर कारवाई केली जाते.
- या नियमानुसार, ६० टक्के कर आणि दंड आणि उपकर मिळून ७७.२५ टक्के कर आहे.
आता लग्नावर जास्त जीएसटी
- आता लग्नांमध्येही जीएसटीही जास्त असेल.
- आता १८ टक्के जीएसटी लग्नाचा हॉलवर देखील भरावा लागेल.
- अलीकडे लग्नाच्या हॉलवर १५% जीएसटी होता.
- यापुढे लग्नात ५.५० लाख खर्च झाला तर सरासरी ९२ हजार ५०० रुपये जीएसटी भरावा लागेल.