मुक्तपीठ टीम
इतिहासजमा झालेली बृहन्मुंबई स्टॉर्मवॉटर डिस्पोजल सिस्टीम म्हणजे ब्रिमस्टोवॅड च्या अंतर्गत पुन्हा नवीन पर्जन्यजल उदंचन केंद्राचा घाट मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी खात्याने घातला आहे. त्याची नवी पुनरावृत्ती एम पश्चिम विभागातील माहुल येथे होणार आहे. त्यासाठी ४११ कोटी रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. मुंबईतील सांडपाण्याच्या निचरा व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी ब्रिमस्टोवॅड हा नियोजित प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आॅगस्ट २००५ पर्यंत १२ अब्ज (अंदाजे ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) या उच्च-बजेट प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधीची आवश्यकता होती. मुंबईमधील सांडपाणी निचरा करणारी करणारी (ड्रेनेज सिस्टीम) व्यवस्था अनेक ठिकाणी १०० वर्षांहून जुनी आहे, यात तब्बल २ हजार कि.मीचे उघडे नाले आणि तब्बल ३० हजार जास्त पाण्याचे प्रवेशद्वार व ४४० कि.मीचे बंद नाले आणि १८६ आऊटफॉल्स नाले आहेत.
या प्रकल्पाचा प्रारंभिक अंदाजित खर्च सुमारे ६ अब्ज रुपये होता. १९९८ पर्यंत या प्रकल्पावर सुमारे १.४३ अब्ज रुपये खर्च करण्यात आले आणि सन २००५ पर्यंत प्रकल्पाची किंमत १२ अब्ज रुपयांवर गेली होती. ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशींनुसार मुंबईत एकूण ८ ठिकाणी पर्जन्यजल उदंचन केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित होते. आठ केंद्रांपैकी हाजीअली, बिर्ला, लवग्रोव , क्लिवलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध या उदंचन केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत आणि ती कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मात्र मोगरा व माहुल या दोन ठिकाणच्या पर्जन्याच्या उदंचन केंद्रांचे काम बाकी आहे. याकरीता पालिकेच्या ह्यएम पश्चिम विभागांमधील माहूल येथे पर्जन्यजल उदंचन केंद्र उभारण्याचे पालिकेने प्रस्ताविले आहे. या प्रस्तावित केंद्रांमुळे पूर्व उपनगरांमधील कॅटमेंट क्षेत्र ५०१ ते ५०८ मधील नेहरूनगर, टिळक नगर किंग्ज सर्कल, कलेक्टर, सिंधी कॉलनी आणि शीव या क्षेत्रांमधील पावसाळ्यामध्ये निर्माण होणारी पूरसदृश्य परिस्थिती व नियंत्रण करता येणे शक्य होईल, असा पालिकेचा दावा आहे. या कामांसाठी मे. एन.जी. एस. इंडियाने या कामांसाठी ३४३ कोटी ६ लाख ४४ हजार १७३ रुपयांचे तपशीलवार अंदाजपत्रक तयार केले.
या सल्लागारांनी अंदाजपत्रक तयार झाल्यावर या उदंचन केंद्राची उभारणी करण्याकरिता ७ जानेवारी २०२२ रोजी डिझाईन बिल्ड अँड आॅपरेट बेसिस वर ई निविदा मागवण्यात आल्या. निविदांना स्पर्धात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी खात्याने सक्षम अधिका-यांची मंजुरी घेतली आणि निविदा सादर करण्याची मुदत २१ जानेवारी २२ पर्यंत वाढवली. त्याला प्रतिसाद म्हणून १० निविदांची विक्री झाली आहे आणि त्यापैकी ३ निविदा सादर झाल्या.
त्यापैकी लक्ष्मी अविघ्न विलो जेवी यांची निविदा कार्यालयीन अंदाजापेक्षा अधिक २४.५६ टक्के म्हणजेच, प्रथम लघुत्तम आली आहे . पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या अधिका-यांनी अंतिम वाटाघाटी केल्यानंतर ह्यमे. लक्ष्मी अविघ्न विलो जेवी यांना ४११ कोटी रुपयांमध्ये हा देकार दिला व तसे संमतीपत्र दिले आहे.
अंदाजपत्रक ३४३ कोटींचे, मंजूर निविदा ४११ कोटींची
लक्ष्मी अविघ्न विलो जेवी यांची मुळ निविदा ४२७ कोटी ३० लाख ६३ हजार ६५२ रुपयांची होती. अंतिम वाटाघाटीनंतर ती ४११ कोटी रुपये झाली. मात्र या कामांसाठी मे. एन.जी. एस. इंडियाने या कामांसाठी ३४३ कोटी ६ लाख ४४ हजार १७३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. अंदाजपत्रकापेक्षा ६८ कोटी रुपयांनी जास्त असलेली ४११ कोटींची निविदा पर्जन्य जलवाहिनी खात्याने मंजूर केली. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.