Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजची संध्याकाळ एक्झिट पोलची! समजून घ्या एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल…निकालाआधीच निकालामागील गोष्ट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
What is exit poll What is opinion poll

मुक्तपीठ टीम

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या तीन दिवसांत जाहीर होणार आहे. यानंतर या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी निकालाचा अंदाज मांडायला सुरुवात केली आहे. आज न्यूज चॅनल्सवर एक्झिट पोल जाहीर केले जातील. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जाईल.

निवडणुकांच्या पूर्वी जनमत चाचणी घेत कल जाणून घेतले जातात. या जनमत चाचण्यांमध्ये यात दोन प्रकारचे पोल असतात. एक म्हणजे ओपिनियन पोल आणि दुसरा म्हणजे एक्झिट पोल. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? या दोन्ही पोलमध्ये नेमका काय फरक आहे? हे आज आपण जाणून घेऊयात…

 

एक्झिट पोल म्हणजे काय?

  • खरे तर एक्झिट पोल हे एक प्रकारचा निवडणूक सर्वेक्षण आहे.
  • मतदानाच्या दिवशी मतदार मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडतो तेव्हा विविध सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांचे लोक काही ठिकाणी असतात.
  • ते मतदारांना मतदानाबाबत प्रश्न विचारतात.
  • यामध्ये त्यांना विचारण्यात येते की, त्यांनी कोणाला मत दिले? अशा प्रकारे प्रत्येक निवडणुकीनुसार वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदारांना प्रश्न विचारले जातात.
  • मतदान संपेपर्यंत अशा प्रश्नांची वेगवेगळ्या टप्प्यातील उत्तरं मोठ्या प्रमाणात जमा होतात.
  • ही माहिती गोळा करून त्यांच्या उत्तरानुसार जनतेचा कल कोणत्या बाजूने आहे, याचा अंदाज येतो.

 

एक्झिट पोल कसे केले जातात?

  • एक्झिट पोलसाठी, सर्व्हे एजन्सीचा किंवा वृत्तवाहिनीचा रिपोर्टर अचानक एका बूथवर जातो आणि तिथल्या लोकांशी बोलतो.
  • साधारणपणे ३०-३५ हजार ते एक लाख मतदार मजबूत एक्झिट पोलसाठी चर्चेत असतात.
  • यामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे.

 

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये काय फरक?

  • ओपिनियन पोल मतदानापूर्वी केला जातो, तर एक्झिट पोल हा मतदान झाल्यानंतर.
  • ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी असते.
  • मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो.
  • ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते.
  • एक्झिट पोल हा मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केला जातो.

 

एक्झिट पोल सगळ्या ठिकाणचे तसेच टप्प्यांचे मतदान झाल्यावर का जाहीर?

  • यावेळच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील निवडणुका सात टप्प्यांमध्ये झाली.
  • त्यामुळे सर्व टप्प्यांचे मतदान झाल्यानंतरच म्हणजे आज सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतरच इतर सर्व टप्प्यांमधील तसेच राज्यांमधील एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करण्यावर बंदी होती.
  • जर टप्प्यानुसार किंवा दुसऱ्या राज्यांमधील निष्कर्ष आधीच जाहीर झाले तर मतदान होणे बाकी असलेल्या ठिकाणी मतदान करणाऱ्या मतदारांवर प्रभाव पडण्याची शक्यता असते.

 

पहिला ओपिनियन पोल कधी झाला?

  • जगातील पहिले निवडणूक सर्वेक्षण अमेरिकेत सुरू झाले.
  • जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी अमेरिकन सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांची मते जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले.
  • नंतर ब्रिटनने १९३७ मध्ये आणि फ्रान्सने १९३८ मध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केले.
  • यानंतर जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम आणि आयर्लंडमध्ये निवडणूकपूर्व सर्वेक्षण करण्यात आले.

 

पहिला एक्झिट पोल कधी झाला?

  • नेदरलँडचे समाजशास्त्रज्ञ आणि माजी राजकारणी मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली होती.
  • वॉन डॅमने १५ फेब्रुवारी १९६७ रोजी प्रथम वापरले.
  • त्या वेळी नेदरलँडमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचे आकलन अगदी अचूक होते.
  • भारतातील एक्झिट पोलची सुरुवात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन (IIPU) चे प्रमुख एरिक डी कोस्टा यांनी केली होती.
  • १९६६ मध्ये एक्झिट पोल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.
  • त्यावेळी दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) ला देशभरातील एक्झिट पोल घेण्यास परवानगी दिली होती.
  • १९९८ मध्ये प्रथमच एक्झिट पोल टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.

 

भारतात कोण करतं एक्झिट पोलचं काम?

  • csds
  • इंडिया टुडे-अॅक्सिस
  • टाईम्स नाऊ-सीएनएक्स
  • News18-IPSOS
  • टुडे चाणक्य
  • एबीपी-सी व्होटर
  • newsx-नेता

Tags: exit pollopinion pollएक्झिट पॉलओपिनियन पॉलनिवडणुका
Previous Post

मुंबईसाठी आता पुन्हा ब्रिमस्टोवॅडची आठवण! माहुलला पर्जन्य जल उदंचन केंद्रासाठी ४११ कोटी!!

Next Post

महाराष्ट्रात १८ एप्रिल २०२०नंतर सर्वात कमी नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही!

Next Post
mcr maharashtra corona report

महाराष्ट्रात १८ एप्रिल २०२०नंतर सर्वात कमी नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!