Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गाडीवर गोळीबारानंतर एमआयएमच्या ओवेसींना झेड सुरक्षा! २२ पोलीस तैनात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Owaisi

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशात आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आलेले एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. चार ते पाच एनएसजी कमांडोसह एकूण २२ सुरक्षा रक्षक झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात असतात.

 

झेड श्रेणीच्या सुरक्षेत २२ रक्षक तैनात

  • चार ते पाच एनएसजी कमांडोसह एकूण २२ सुरक्षा रक्षक झेड श्रेणीच्या सुरक्षेत तैनात आहेत.
  • यामध्ये दिल्ली पोलिस, आयटीबीपी किंवा सीआरपीएफचे कमांडो आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे.

 

माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी

  • तर, हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे.
  • १९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
  • आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही.
  • मला हे आवडतही नाही.
  • माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे.
  • मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही.
  • जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन.

 

संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद

  • एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता गोळीबार झाला.
  • त्यांचा ताफा दिल्ली परताना ही घटना घडली.
  • दोन तरुणांनी कारच्या खाली गोळीबार केला.
  • यावेळी समर्थकांनी हल्लेखोरांपैकी एकाला पकडून टोल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
  • त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दुसऱ्यालाही पकडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

भाषणाचा राग आल्याने केला हल्ला

  • पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सचिन आणि शुभम अशी आहेत.
  • ओवेसींच्या द्वेषपूर्ण भाषणाचा मला राग आला होता, म्हणून त्यांनी हा हल्ला केल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले.
  • चौकशीत सचिनने सांगितले की, शुभमसोबत त्याची मैत्री फेसबुकवर झाली होती.
  • त्यानंतर फोनवर बोलणे सुरू झाले.
  • फोनवरच हल्ल्याची योजना आखली.
  • मित्रांकडून पिस्तुल घेतली.
  • हल्ल्यापूर्वी दोघे भेटले आणि कारने टोल प्लाझा गाठले.

Tags: AIMIMAsaduddin Owaisicentral govtUP Electionअसदुद्दीन ओवेसीउत्तर प्रदेश निवडणूकएमआयएमकेंद्र सरकार
Previous Post

एमआयएमच्या ओवेसींवर गोळीबार करणारा फेसबुकवरील ‘देशभक्त’!

Next Post

बनावट नोटांचा काळा धंदा! मोठ्या नोटांचं प्रमाण जास्त, पण एक रुपयाच्याही बनावट नोटा!!

Next Post
fake currancy

बनावट नोटांचा काळा धंदा! मोठ्या नोटांचं प्रमाण जास्त, पण एक रुपयाच्याही बनावट नोटा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!