Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूट्यूब आता एक नवीन करिअर पर्याय! कंटेंट क्रिएटर्सचे जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटींचे योगदान!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
YouTube

मुक्तपीठ टीम

भारतात यूट्यूब क्रिएटर्सची संख्या सतत वाढताना दिसत आहे. यूट्यूबवर कला प्रदर्शित करण्यासाठी अधिकाधिक लोक कंटेंट क्रिएटर्स म्हणून करिअर प्लॅटफॉर्म शोधत आहेत. यूट्यूबने ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीचा अहवाल सादर केला आहे, ज्यातून हे दर्शविले जाते की, यूट्यूबचे क्रिएटर्स इकोसिस्टम प्रचंड आर्थिक मूल्य निर्माण करत आहे आणि सुमारे ६.८४ लाख लोकांना पूर्णवेळ नोकऱ्या देत आहे. २०२० मध्ये, त्याने भारतीय अर्थव्यवस्थेत ६ हजार ८०० कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले.

 

करिअर बनवण्याव्यतिरिक्त कमाईचा नवा मार्ग

  • सध्या भारतातील १ लाखाहून अधिक सब्सक्राइबर्स असलेल्या चॅनेलची संख्या ४० हजरांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी दर वर्षी ४५ टक्के वाढ नोंदवली आहे.
  • यासह, यूट्यूब क्रिएटर्स या प्लॅटफॉर्मवर नवीन संधी आणि प्रेक्षक तसेच उत्पन्न मिळविण्याचे नवीन मार्ग उघडत आहेत.
  • यूट्यूब प्लॅटफॉर्मवर चॅनेलची कमाई करण्याचे ८ वेगवेगळे मार्ग आहेत.
  • दरवर्षी किमान १ लाख रुपये कमावणाऱ्या चॅनेलची संख्या ६० टक्क्यांनी वाढत आहे.

 

यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सचे जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटींचे योगदान

  • व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या ‘क्रिएटर इकोसिस्टम’ने २०२० मध्ये देशांतर्गत अर्थव्यवस्थेत ६ हजार ८०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
  • स्वतंत्र सल्लागार कंपनी ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जारी केलेला अहवाल, भारतातील यूट्यूबच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाचे मूल्यांकन करतो.

 

रोजगाराचे नवीन स्त्रोत

  • ऑनलाइन संभाषणात निष्कर्ष जाहीर करताना, यूट्यूबने सांगितले की, “या अहवालात असे दिसून आले आहे की यूट्यूब इकोसिस्टमने भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय आर्थिक मूल्य निर्माण केले आहे.”
  • यूट्यूबने २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
  • देशात यूट्यूबचे ४४८ दशलक्ष यूजर्स आहेत.
  • यूट्यूबने सांगितले की, उत्पन्नाचे हे स्रोत केवळ सर्जनशील उद्योजकांसाठी नोकऱ्या आणि उत्पन्नाचे समर्थन करत नाहीत तर पुरवठा साखळींमध्ये व्यापक क्रियाकलापांना प्रोत्साहन देखील देतात.

 


Tags: careerContent Creatorsgdpgood newsmuktpeethyoutubeकंटेंट क्रिएटर्सकरिअरचांगली बातमीजीडीपीमुक्तपीठयूट्यूबरोजगार संधी
Previous Post

साताऱ्यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी

Next Post

ग्लोबल टॉपर्स शेअर्स खरेदी करण्यासाठी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजची सुविधा

Next Post
National Stock Exchange of India

ग्लोबल टॉपर्स शेअर्स खरेदी करण्यासाठी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!