Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ग्लोबल टॉपर्स शेअर्स खरेदी करण्यासाठी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजची सुविधा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
National Stock Exchange of India

मुक्तपीठ टीम

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने आता भारतीय गुंतवणूकदारांसाठी ग्लोबल गुंतवणूक सोपी बनवली आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने निवडक अमेरिकन स्टॉक्समध्ये ट्रेडिंगची घोषणा केली आहे. आता गुगल, अॅपल, टेस्ला या नामांकित कंपन्यांसह ८ स्टॉकमध्ये देखील ट्रेडिंग करता येणार आहे. याची सोय एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे केली जाईल. ही ऑफर प्रायोजित नसलेल्या डिपॉझिटरी पावत्यांच्या स्वरूपात असेल.

 

सध्या अमेरिकन कंपन्यांच्या शेअरमध्ये ट्रेडिंग

  • एक्सचेंजने एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज पावत्यांची यादी सामायिक केली ज्यासाठी ०३ मार्च २०२२ रोजी ट्रेडिंग सुरू झालं.
  • त्यात आठ अमेरिकन स्टॉक्सचा समावेश आहे.
  • अल्फाबेट (गुगल), अॅमेझॉन, टेस्ला, मेटा प्लॅटफॉर्म्स (फेसबुक), मायक्रोसॉफ्ट, अॅप्पल, नेटफ्लिक्स आणि वॉलमार्ट असे हे आठ अमेरिकन स्टॉक आहेत.

 

नॅशनल स्टॉक एक्सेंज समुहाचे अध्यक्ष रवी वाराणसी म्हणाले, “आम्ही टॉपच्या आठ अमेरिकन शेअर्ससह ट्रेडिंग सुरू करत आहोत. बाजार भांडवलानुसार टॉप ५० शेअर्सपर्यंत विस्तार करू. भविष्यात युरोपियन स्टॉकडेही आम्ही वळू शकतो.”

 

गुंतवणूकदार काय करू शकतात?

  • निवडक अमेरिकन स्टॉक्सवरील उर्वरित एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज पावत्यांसाठी, ट्रेडिंग सुरू होण्याची तारीख वेगळ्या परिपत्रकाद्वारे कळविली जाईल.
  • अमेरिकन स्टॉकचे संपूर्ण व्यापार, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंग आयएफएससी प्राधिकरणाच्या नियामक संरचनेच्या अंतर्गत असेल.
  • डिमॅट खात्यांमध्ये गुंतवणूकदार डिपॉझिटरी पावत्या ठेवण्यास सक्षम असतील आणि अंतर्निहित स्टॉकशी संबंधित कॉर्पोरेट अॅक्शन फायदे मिळवण्याचा हक्कदार असतील.
  • एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने ऑगस्टमध्ये एका परिपत्रकात म्हटले आहे की, “हा उपक्रम आयएफएससीमधील अशा प्रकारचा पहिला आहे जिथे भारतीय रिझर्व्ह बँकेने विहित केलेल्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम मर्यादेअंतर्गत भारतीय रिटेल गुंतवणूकदार एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकतात.

 


Tags: Americagood newsmuktpeethNational Stock Exchange of IndiaStock tradingअमेरिकाइंटरनॅशनल एक्सचेंजएनएसईग्लोबल टॉपर्सचांगली बातमीनॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियामुक्तपीठशेअर ट्रेडिंगशेअर्स खरेदी
Previous Post

यूट्यूब आता एक नवीन करिअर पर्याय! कंटेंट क्रिएटर्सचे जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटींचे योगदान!

Next Post

सीएनएच इंडस्ट्रीयलचे भारतात नवीन इंडिया टेक्नोलॉजी सेंटर, अभियांत्रिकी, संशोधन आणि विकासाची सुविधा!

Next Post
CNH Industrial

सीएनएच इंडस्ट्रीयलचे भारतात नवीन इंडिया टेक्नोलॉजी सेंटर, अभियांत्रिकी, संशोधन आणि विकासाची सुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!